इस्त्रोची आणखी एक कमाल, भारताच्या 4700 किलोच्या सॅटेलाइटचे प्रक्षेपण एलन मस्कच्या रॅकेटमधून, कारण…

ISRI GSAT 20 satellite Launched: जीसॅट एन 2 ला जीसॅट-20 म्हटले जाते. हा एक थ्रूपुट कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. तो केए बँडवर काम करतो. त्याला न्यूस्पेस इंडिया लिमिटेडने विकसित केले आहे. न्यूस्पेस इस्त्रोची व्यावसायिक शाखा आहे.

इस्त्रोची आणखी एक कमाल, भारताच्या 4700 किलोच्या सॅटेलाइटचे प्रक्षेपण एलन मस्कच्या रॅकेटमधून, कारण...
ISRO
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 12:20 PM

ISRI GSAT 20 satellite Launched: भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) आणखी एक जबरदस्त कामगिरी केली आहे. इस्त्रोने सोमवारी रात्री GSAT-20 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारताच्या या उपग्रहाचे प्रक्षेपण एलन मस्कच्या रॉकेटमधून करण्यात आले. एलन मस्कची कंपनी स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट आहे. इस्त्रोच्या जीसॅट 20 संप्रेषण उपग्रह केप कॅनवेरलचे फ्लोरिडा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोच्या 4700 किलो GSAT-N2 उपग्रहाचा उद्देश दुर्गम भागात डेटा किंवा इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे.

यामुळे व्यावसायिक करार

जीसॅट उपग्रह भारतीय उपमहाद्वीपमध्ये इन फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हीटी सक्षम बनवण्यासाठी करण्यात आला आहे. इस्रोचे मार्क-3 प्रक्षेपण वाहन जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 4000 किलो वजन वाहून नेऊ शकते, परंतु GSAT-N2 चे वजन 4700 किलो होते. त्यामुळे भारताला एलन मस्कच्या कंपनीसोबत व्यावसायिक करार करावा लागला. एलन मस्कच्या स्पेसएक्सच्या लॉन्च व्हेकलद्वारे उपग्रह अवकाशात उडाला.

हे सुद्धा वाचा

काय होणार फायदा

जीसॅट एन 2 ला जीसॅट-20 म्हटले जाते. हा एक थ्रूपुट कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. तो केए बँडवर काम करतो. त्याला न्यूस्पेस इंडिया लिमिटेडने विकसित केले आहे. न्यूस्पेस इस्त्रोची व्यावसायिक शाखा आहे. स्पेस इंडिया लिमिटेडने या लॉन्चिंगची संपूर्ण माहिती सोशल मीडिया एक्सवर शेअर केली आहे. यूआर राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक डॉ एम शंकरन म्हणाले, हा स्वदेशी उपग्रह कार्यान्वित झाल्यावर जागतिक नकाशावर भारतातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीमधील असणारा फरक भरुन निघेल.

इस्त्रोने सांगितले की GSAT-N2 उपग्रहामध्ये एकाधिक स्पॉट बीम आहेत. त्यामुळे लहान वापरकर्ता टर्मिनल्सद्वारे मोठ्या वापरकर्त्यांना आधार देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. इस्रोच्या मते, GSAT-N2 चे मिशन लाइफ 14 वर्षे आहे आणि त्यात 32 युजर बीम आहेत. ईशान्य प्रदेशात 8 अरुंद स्पॉट बीम आणि 24 रुंद स्पॉट बीम उर्वरित भारत व्यापतात. त्यांना संपूर्ण भारतातील हब स्टेशन्सद्वारे सपोर्ट केले जाईल. उपग्रहाचा का-बँड हाय-थ्रूपुट कम्युनिकेशन्स पेलोड अंदाजे 48 Gbps चा थ्रूपुट प्रदान करतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.