Chandrayaan-3 Update | ISRO ने विक्रम लँडरचा टि्वट केलेला ताजा फोटो लगेच डिलीट का केला? काय कारण?
Chandrayaan-3 Update | चांद्रयान-2 कॅमेऱ्यामधून हा फोटो काढण्यात आला होता. अजूनही देशात या यशाच सेलिब्रेशन सुरु आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग सोपं नव्हतं. अखेरची 17 मिनिट मिशनसाठी खूप महत्त्वाची होती.
बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरने बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल. तमाम देशवासियांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण देशात या यशाच जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांच्या कामगिरीमुळे आज तमाम देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. अजूनही देशात या यशाच सेलिब्रेशन सुरु आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग सोपं नव्हतं. अखेरची 17 मिनिट मिशनसाठी खूप महत्त्वाची होती.
पण इस्रोच्या वैज्ञानिकांनी कमाल केली. कुठलीही गडबड होऊ न देता चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं. 2019 मध्ये चांद्रयान-2 मिशनच्यावेळी सॉफ्ट लँडिंगमध्ये भारताला अपयश आलं होतं.
लँडिंगच्या अखेरच्या क्षणांचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट
चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यापासून इस्रोने चांद्रभूमीचे वेगवेगळे फोटो टि्वटरवरुन शेअर केले आहेत. अगदी काल लँडिंगच्या अखेरच्या क्षणांचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. विक्रम लँडरमध्ये हाय रेसोल्युशनचा कॅमेरा आहे. त्या माध्यमातून चांद्रभूमीचे वेगवेगळे फोटो टिपण्यात येत आहेत. शुक्रवारी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने टि्वटरवर एक फोटो शेअर केला होता.
विक्रम लँडरचा फोटो काढला
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्रावर असलेल्या विक्रम लँडरचा फोटो काढला होता. चांद्रयान-2 मिशनमधील लँडिंग फसल होतं. पण त्यासोबत असलेला ऑर्बिटर मात्र अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करतोय. याच ऑर्बिटरने चांद्रयान-3 मधील चंद्रावर असलेल्या विक्रम लँडरचा फोटो काढलाय. ऑर्बिटरमध्ये हाय रेसोल्युशन कॅमेरा आहे.
Here is how the Lander Imager Camera captured the moon’s image just prior to touchdown. pic.twitter.com/PseUAxAB6G
— ISRO (@isro) August 24, 2023
‘आय स्पाय ऑन यू’
इस्रोने विक्रम लँडरचे हे फोटो टि्वटरवर पोस्ट केले होते. पण काहीवेळातच हे टि्वट डिलीट करण्यात आलं. ‘आय स्पाय ऑन यू’ असं या फोटोला कॅप्शन देण्यात आलं होतं. हे फोटो का डिलीट करण्यात आले? त्यामागे काय कारण आहे? हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरचे बुधवारी यशस्वी लँडिंग केलं. त्यानंतर काही तासांनी लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. आता लँडर आणि रोव्हर दोघांनी चंद्रावर आपलं संशोधन कार्य सुरु केलय.