ISRO च्या ताकतीवर शिक्कामोर्तब, JAXA भारताच्या मदतीने पोहोचणार चंद्रावर, कोण आहे जाक्सा?
Chandrayaan 3 | चांद्रयान-3 मिशनच्या माध्यमातून इस्रोने संपूर्ण जगाला आपल्या क्षमतेचा परिचय करुन दिलाय. जगातील अनेक देश इस्रोसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. 2025 मध्ये भारत आणखी एका देशासोबत मिळून चांद्र मोहिम करणार आहे.
नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्टला चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. या मिशनच्या माध्यमातून ISRO ने संपूर्ण जगाला आपली क्षमता दाखवून दिली. महत्त्वाच म्हणजे अत्यंत कमी खर्चात भारताच हे मिशन पार पडलं. त्याचं जगातील अनेक देशांना आश्चर्य वाटतय. इस्रोसोबत स्वत:ला जोडून घेण्यासाठी जगातील अनेक देश पुढे येत आहेत. इस्रोच्या कामगिरीमुळे आज समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश आहे.
चांद्रयान-3 मिशनने इतिहास रचला आहे. भारतीय वैज्ञानिकांनी आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच थक्क करुन सोडलय. भारत आता पुढच्यावेळी जापानला दक्षिण ध्रुवावर घेऊन जाणार आहे. जापानची स्पेस रिसर्च एजन्सी JAXA ने यासाठी ISRO बरोबर करार केलाय. दोन्ही अवकाश संशोधन संस्था मिळून नवीन मून मिशनवर काम करत आहेत. या मिशनला LUPEX नाव देण्यात आलं आहे. भारतात हे मिशन चांद्रयान-4 म्हणून ओळखलं जाईल. चांद्रयान-3 मिशनद्वारे भारताने जगात आपला एक दबदबा निर्माण केला आहे. भारतानंतर आता जापान चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या शर्यतीत आहे.
दोनवेळा लॉन्चिंगची डेट बदलली
जापानला आपला स्मार्ट लँडर स्लिमला चंद्राच्या पुष्ठभागावर उतरवायच आहे. अलीकडेच दोनवेळा लॉन्चिंगची डेट बदलण्यात आलीय. या मिशनचा निकाल काहीही असो, पण जापानची स्पेस एजन्सी JAXA ने पुढच्या मून मिशनसाठी इस्रोशी हातमिळवणी केलीय. LUPEX च पूर्ण नाव लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन आहे. ही मानवरहीत मोहिम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा सखोल अभ्यास करणं आणि पाण्याच्या शक्यतेची पुष्टी करणं हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. हे मिशन किती महिन्यांसाठी असेल?
मिशनसाठी लॉन्च व्हेईकल आणि रोव्हर तयार करण्याची जबाबदारी जापानच्या एयरोस्पेस एक्सप्लोरेशनवर आहे. या मिशनसाठी इस्रो लँडर तयार करणार आहे. JAXA नुसार, मिशन 2025 मध्ये लॉन्च केलं जाईल. 3 ते 6 महिन्यांसाठी ही मोहिम असेल. JAXA च्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, चांद्रयान-4 चा लँडर आणि रोव्हर प्रामुख्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेईल. पाण्याशिवाय हायड्रोजनचा शोध घेतला जाईल. चंद्रावरील पाणी असल्यास जमिनीच्या आता किती प्रमाणात आहे, त्याता शोध घेतला जाईल. चंद्रावर पाणी कुठून आलं? हे यातून समजेल.