अजोबांनी दिले असे गिफ्ट, चार महिन्यांचा नातू झाला कोट्यधीश

Infysos Narayan Murthy | एका अजोबाने आपल्या चार महिन्यांच्या नातूला असे गिफ्ट दिले की तो कोट्यधीश झाला. अजोबाच्या या पावलाची चर्चा सर्वत्र होत आहे. हा चार महिन्यांचा मुलगा रोहन आणि अपर्णा यांचा मुलगा आहे.

अजोबांनी दिले असे गिफ्ट, चार महिन्यांचा नातू झाला कोट्यधीश
four month baby file photo
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 8:06 AM

नवी दिल्ली: अजोबा आणि नातू यांच्यातील नाते अनोखे असते. मुलापेक्षा जास्त प्रेम अजोबा नातावर करत असल्याचे म्हटले जाते. घरात आलेल्या नवीन पाहुण्याची उत्सुक्ता त्याच्या आई-बाबांप्रमाणे आजी-अजोबाला कमालीची असते. एका अजोबाने आपल्या चार महिन्यांच्या नातूला असे गिफ्ट दिले की तो कोट्यधीश झाला. अजोबाच्या या पावलाची चर्चा सर्वत्र होत आहे. हे अजोबा दुसरी तिसरे कोणी नाही, ते प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आहेत. त्यांनी त्यांचा चार महिन्यांचा नातू एकाग्र याला हे गिफ्ट दिले आहे. तो रोहन आणि अपर्णा यांचा मुलगा आहे.

नातू बनला कोट्यधीश

नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी आठवड्याला 70 तास काम करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. आपण स्वत: 80 ते 90 तास काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर दोन्ही बाजूने चर्चा झाली. अनेकांनी पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला. आता नारायण मूर्ती पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी त्यांच्या चार महिन्यांच्या नातवाला 15 लाख शेअर गिफ्ट दिले आहेत. या शेअरची किंमत 240 कोटी रुपये आहे. यामुळे त्यांचा नातू एकाग्र वयाच्या चौथ्या महिन्यात कोट्यधीश झाला आहे.

किती टक्के शेअर दिले

नारायण मूर्ती यांनी त्यांच्या कंपनीतील 0.04% शेअर नातू एकाग्र याला दिले आहे. त्याचा जन्म 10 नोव्हेंबर 2023 मध्ये झाला. तो नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन आणि सून अपर्णा यांचा मुलगा आहे. नारायण मूर्ती यांनी नातवाला शेअर गिफ्ट केल्यानंतर इन्फोसिसमध्ये त्यांची भागेदारी 0.40% वरुन 0.36 % आली आहे. नारायण मूर्ती यांनी नातवाचे नाव संस्कृत शब्द एकाग्रपासून प्रेरित होऊन ठेवले.

हे सुद्धा वाचा

नारायण मूर्ती यांच्या मुलीस दोन मुली

एकाग्र यांच्या जन्मापूर्वी नारायण मूर्ती आजोबा बनले आहे. त्यांची मुलगी अक्षता आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत. त्यांची नावे कृष्णा सुनक आणि अनुष्का सुनक आहेत. नारायण मूर्ती यांची कंपनी इन्फोसिस देशातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यांनी दहा हजार रुपायांवर 1981 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. कंपनीच्या स्थापनेपासून तर 2002 पर्यंत नारायण मूर्ती कंपनीचे CEO होते.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....