डॉग स्कॉड, CCTV… आंब्याला व्हीव्हीआयपीसारखी सुरक्षा, कारण काय?

most expensive mango: शेतात 'मियाजाकी' आंब्यासोबत मल्लिका, आम्रपाली, काळा आंबा, चौसा, सफेदा बॉम्बेग्रीन, टाईयो नो, टमँगो, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन, गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खासयासह २४ जातींचे आंबे आहेत.

डॉग स्कॉड, CCTV... आंब्याला व्हीव्हीआयपीसारखी सुरक्षा, कारण काय?
संकल्प सिंह परिहार यांची आंबे बाग
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 2:09 PM

उन्हाळा सुरु झाला म्हणजे तमाम लोकांना आंब्याचे वेध लागतात. फळांचा हा राजाची वाट लहानापासून वृद्धापर्यंत सर्वच जण पाहतात. कोकणातील हापूस आंबा देशातच नाही विदेशात पोहचला आहे. खवय्यांना हापूसची गोडी नेहमीच मोहून घेते. परंतु आता तुम्हाला एक आंब्याच्या बागेसंदर्भात माहिती देणार आहोत. या आंब्याच्या सुरक्षेसाठी ११ विदेशी कुत्रे आहेत. ते २४ तास आंब्याची देखरेख करतात. त्यांचे कर्मचारी आहेत. आंबे असलेल्या आमराईला मोठे कुंपण लावले आहेत. तसेच ८ सीसीटीव्ही कॅमेरे आंब्यासाठी लावले आहेत.

व्हीव्हीआयपी सुरक्षा का?

आता तुम्ही विचार करत असला एखाद्या व्हीव्हीआयपी सारखी सुरक्षा आंब्याला का आहे. कारण ‘मियाजाकी’ नाव असलेल्या हा आंबा मौल्यवान आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अडीच लाख रुपये प्रतिकिलो आहे. या आंब्याची शेती विदेशातच केली जात होती. आता भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील शेतकरी संकल्प सिंह परिहार यांच्या शेतात आंब्यासाठी ही सुरक्षा आहे. या ठिकाणी विविध २४ जातीचे आंबे आहेत. ‘मियाजाकी’ आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलोला अडीच लाख रुपयांना विकला जात आहे.

नर्मदा किनारी शेती

शेतकरी संकल्प सिंह परिहार यांच्या शेतात ‘मियाजाकी’ आंब्यासोबत मल्लिका, आम्रपाली, काळा आंबा, चौसा, सफेदा बॉम्बेग्रीन, टाईयो नो, टमँगो, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन, गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खासयासह २४ जातींचे आंबे आहेत. संकल्प यांच्या बागेतील संपूर्ण आंबा त्यांच्या बागेतूनच विकले जातात. त्यांना बाजारात जाण्याची गरज पडत नाही. जबलपूरमध्ये नर्मदा नदीच्या किनारी त्यांची शेती आहे. या शेतीत ते आधुनिक पद्धतीने शेती करतात.

हे सुद्धा वाचा

पहिला आंबा भगवान महाकालसाठी

संकल्प सिंह परिहार म्हणतात, “आमच्या बागेतील प्रत्येक प्रकारच्या आंब्याचे पहिले फळ सर्वप्रथम भगवान महाकाल (उज्जैन येथील ज्योतिर्लिंगों) अर्पण करण्यासाठी जातो. त्यानंतर आम्ही आंब्याची बाजारात विक्री करतो.” संकल्प यांची आंब्याची बाग जबलपूर शहरापासून जवळ आहे. या बागेत स्वादिष्ट गोड आंबे पिकतात, हे अनेकांना माहीत आहे, त्यामुळे आंबे चोरण्याचा अनेकदा प्रयत्न होतो. त्यामुळे एखाद्या खजिन्याप्रमाणे बागेचे रक्षण केले जाते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.