हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षांच्या मुलीची दिक्षा, लहान वयात का बनताय जैन मुले साध्वी?
मागील महिन्यात मध्य प्रदेशातील देवासमधील पर्यान्षुक कराठे याने कोट्यावधीचे पॅकेज सोडून दीक्षा घेतली होती. १ फेब्रवारी २०२० मध्ये सुरतमध्ये ६५ जणांनी दीक्षा घेतली होती. त्यातील १७ जणांचे व २० वर्षांपेक्षा कमी आहे.
सुरत : सुरतमधील (Gujarat Surat) हिरे व्यावसायिकाच्या (Diamond Professional) अवघ्या 8 वर्षांची मुलगी देवांशी हिने जैन धर्माची (jain religion)दीक्षा घेतली आहे. या मुलीनं विलासी जीवन सोडून भिक्षुत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. देवांशी मोठी झाल्यावर करोडो रुपयांच्या हिरे कंपनीची मालकीन बनली असती.परंतु तिने सर्व ऐशोआराम व चांगले करिअर सोडले आणि संन्याशी जीवन स्वीकारले. दिवांशीचे वडील हिरे व्यापारी धनेश आणि त्यांचं कुटुंब खूप श्रीमंत आहे. परंतु त्यांची जीवनशैली अतिशय साधी राहिली. त्यांचे घराणं सुरुवातीपासूनच धार्मिक आहे. 8 वर्षांच्या देवांशीला हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषा अवगत आहेत. इतकंच नाही तर देवांशी संगीतात पारंगत आहे. नृत्य आणि योगामध्येही ती खूप हुशार आहे. मागील महिन्यात मध्य प्रदेशातील देवासमधील पर्यान्षुक कराठे याने कोट्यावधीचे पॅकेज सोडून दीक्षा घेतली होती. १ फेब्रवारी २०२० मध्ये सुरतमध्ये ६५ जणांनी दीक्षा घेतली होती. त्यातील १७ जणांचे व २० वर्षांपेक्षा कमी आहे.
काय असते जैन धर्मात दीक्षा : जैन धर्मातील दीक्षा घेणे म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे आहे. दीक्षा घेणाऱ्यांना तपस्वीचे जीवन जगावे लागते. जैन धर्मात याला ‘चरित्र’ किंवा ‘महानिभिश्रमण’ असेही म्हणतात. दीक्षा घेतल्यानंतर अंहिसा, सत्य बोलणे, ब्रम्ह्यचार्य पालन, अस्तेय म्हणजे लालच न करणे, अपरिग्रह म्हणजे गरजेइतकेच संचय करणे यांचे पालन करावे लागते. भिक्षा मागून जीवन जगावे लागते. सूती कपडे परिधान करावे लागतात. पायीच प्रवास करावा लागतो. दीक्षा घेताना आपल्या डोक्यावरील केस स्वत:च्या हाताने ओढून काढावे लागतात. त्यानंतर दीक्षा घेण्याचा क्रम पुर्ण होतो.
का घेताय मुले-मुली दीक्षा :
गेल्या काही वर्षांत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लहान मुले आणि तरुण जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. या सर्वांची कारणे वेगवेगळी असतील. परंतु सर्वांचे मूळ एकच आहे. मत अस्वस्थ व बैचन असणे. भौतिक सुखसोयी त्यांना मानसिक आनंद देऊ शकल्या नाहीत. म्हणूनच त्याने साधे जीवन जगण्याचा आणि स्वतःला देवाच्या उपासनेसाठी समर्पित करण्याचा निर्णय ही मुले-मुली घेत आहेत.
- मनात शांतता जागृत होऊ लागते
- जैन मुनींची कठोर जीवनशैली त्यांना वास्तविक जीवनाचे सार वाटते.
- जैन धर्मात लहानपणापासूनच मुले जैन मुनींच्या संपर्कात येतात.त्यांचे जीवन पाहतात. हे जीवन त्यांच्यावर प्रभाव टाकतात.
- घरातील पालकांचा धर्माशी असलेला दृढ संबंधही त्यांना दीक्षेच्या दिशेने घेऊन जातो.