Hijab Row : मुलींनी हिजाब घालणं आवश्यक आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना मौलाना मदनी म्हणाले की…
Hijab Row : पीएम नरेंद्र मोदी, बांग्लादेशमध्ये हिंदुंविरोधात हिंसाचार, वक्फ संशोधन, मोदी सरकारच परराष्ट्र धोरण, संविधान, कुरान शरीफ आणि बुलडोझर कारवाईसह वेगवेगळ्या मुद्यांवर मौलाना महमूद मदनी यांनी बिनधास्तपणे आपल मत मांडलं.
जमीयत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी बुधवार टीवी 9 भारतवर्षचा खास कार्यक्रम 5 एडिटर्समध्ये पीएम नरेंद्र मोदी, बांग्लादेशमध्ये हिंदुंविरोधात हिंसाचार, वक्फ संशोधन, मोदी सरकारच परराष्ट्र धोरण, संविधान, कुरान शरीफ आणि बुलडोझर कारवाईसह वेगवेगळ्या मुद्यांवर बिनधास्तपणे आपलं मत मांडलं. मुस्लिम मुलींनी हिजाब परिधान करण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, ‘तुम्ही हिजाबला विकासाच्या मार्गात अडथळा का समजता?’. मुलींसाठी हिजाब आवश्यक आहे का? या प्रश्नावर मौलाना महमूद मदनी म्हणाले की, “तुम्ही विकासाच्या मार्गात हिजाबला अडथळा का समजता? शिक्षणामध्ये हिजाबला अडथळा का मानता?”
हिजाबमध्ये चॉईसच्या मुद्यावर मौलान मदनी म्हणाले की, “यामध्ये चॉईस असली पाहिजे. ज्या मुलीला हिजाब परिधान करायचा असेल, तिला हिजाब घालूं दे. जिला हिजाबशिवाय शिक्षण घ्यायच असेल, तिला तसं करुं दे. तिच स्वातंत्र्य का हिरावून घेताय? कोणावर सक्ती करु नका. हाच आमचा इस्लाम आहे. हाच आमचा सनातन धर्म, देश आहे” राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’वर मौलाना मदनी म्हणाले की, “कोणी प्रेमाबद्दल बोलत असेल, तर त्याच स्वागत आहे. मी कौतुक केलं, तर तुम्ही म्हणाल मी राहुल गांधींच कौतुक करतोय. मोहब्बतबद्दल जो कोणी बोलेल त्याच कौतुक होईल”
बुलडोझर Action बद्दल मौलाना महमूद मदनी काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी कसे वाटतात? त्यांच्याबद्दल काय चांगलं वाटतं? या प्रश्नावर मदनी म्हणाले की, “त्यांच्यात बरेच बदल झालेत. मेहनत करतायत. लोकांमध्ये मिसळत आहेत. ही चांगली बाब आहे. लोक त्यांना स्वीकारतायत” बुलडोझर एक्शनच्या प्रश्वावर मौलाना मदनी म्हणाले की, “कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारच वर्तन योग्य नाही. खासकरुन राज्य सरकारांकडे ही परवानगी असू नये. बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत. पण विषय सुप्रीम कोर्टात आहे. कोर्टाने बरच काही म्हटलं आहे. या मुद्यावर मी जास्त बोलणार नाही”