Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये अखेर दीड वर्षानंतर 4G इंटरनेट सेवा सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये आता सर्व भागात 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या सूचना विभागाचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये अखेर दीड वर्षानंतर 4G इंटरनेट सेवा सुरु
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 10:29 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आता सर्व भागात 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या सूचना विभागाचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कलम-370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सर्वच भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पुढे सरकारने तिथे 2G इंटरनेट सेवा सुरु केली होती. तसंच जम्मूमधील उधमपूर, तर काश्मीरमधील गंदेरबल या जिल्ह्यांमध्ये वर्षभरानंतर 4G इंटरनेट सेवा सुरु केली होती. पण अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र आतापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती.(4G internet service launched in Jammu and Kashmir)

4G इंटरनेट सेवा सुरु केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलंय. “4G मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांकडे 4G मोबाईल डेटा असेल. देर आये, दुरुस्त आये!” , असं अब्दुल्ला म्हणाले.

काश्मीर घाटीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली 4G इंटरनेट सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयातही गेल्या वर्षी एक याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या महिन्यात फारुक अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं होतं.

जम्मू काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा देण्याची मागणी

फारुक अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा देण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये रक्त गोठवणारी थंडी आहे. अशावेळी लोकांकडे 4G इंटरनेट सेवा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना अब्दुल्ला यांनी कोरोना लस सफल ठरो, यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर चालताना लोकांमध्ये धार्मिक सद्भाव आणि माणुसकीचं नातं टिकवण्याचं आवाहन केलं होतं.

‘पंतप्रधानांनी स्वत: येऊन पाहावं’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की भारतात 5G इंटरनेट येत आहे. पण जम्मू-काश्मीरचे लोक 4G सेवेपासून वंचित आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये येत आम्ही कशाप्रकारे अजूनही 2G इंटरनेट सेवेत अडकलो आहोत हे पाहावं, असं आवाहन अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी यांना केलं होतं.

जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा ऑगस्ट 2019 मध्ये राज्याला विशेष दर्जा बहाल केल्यानंतर बरखास्त करण्यात आली होती. तेव्हा फक्त 2 जिल्ह्यांमध्येच 4G इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली होती. त्यात जम्मूतील उधमपूर आणि काश्मीरमधील गांदरबल या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये 1 वर्षानंतर 4G इंटरनेट देण्यात आली होती. 18 जिल्ह्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा निलंबित ठेवण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘कोरोनामुळे पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही’, फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा

दिल्लीच्या संवेदनशील भागात सुरक्षा वाढवा, इंटरनेट सेवा बंद करा, अमित शाहांच्या अधिकाऱ्यांना सूचना

4G internet service launched in Jammu and Kashmir

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.