जम्मू-काश्मीरमध्ये दशहतवाद्यांविरोधात शोध मोहीम; सर्च ऑपरेशनचा 27 वा दिवस, आतापर्यंत 9 जवान शहीद
जवानांकडून सध्या जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यात येत आहे. आज या सर्च ऑपरेशनचा 27 वा दिवस असून या मोहिमेमध्ये आतापर्यंत 9 जवान शहीद झाले आहेत.
श्रीनगर – जवानांकडून सध्या जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यात येत आहे. आज या सर्च ऑपरेशनचा 27 वा दिवस असून या मोहिमेमध्ये आतापर्यंत 9 जवान शहीद झाले आहेत. शनिवारपासून जवानांनी आपले लक्ष राजौरी जिल्ह्यामध्ये केंद्रीत केले असून, राजौरी परिसरामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. शोधमोहिमेत अडथळा येऊ नये, म्हणून या भागातील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. या परिसरात दहशतवाद्यांची एक मोठी तुकडी लपून बसल्याची माहिती सैनिकांना मिळाली असून, मिळालेल्या माहितीनुसार सैनिक खाबला जंगलामध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
11 ऑक्टोबरपासून सुरुवात
आतापर्यंतची जवानांकडून राबवण्यात आलेली ही सर्वात मोठी शोधमोहीम आहे. 11 ऑक्टोबरपासून या सर्च ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली असून, आज 27 वा दिवस आहे. गेल्या 27 दिवसांपासून सैनिक जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. यादरम्यान तीनवेळा जवान आणि सैनिकांमध्ये चकमक झाली, या चकमकीमध्ये 9 जवान शहीद झाले आहेत. सध्या जवानांनी आपले लक्ष राजौरी जिल्ह्यावर केंद्रीत केले असून, राजौरीच्या खाबला जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खबला परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असून या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्थानिक पोलीसांच्या मदतीने जवान लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
राजौरीच्या खाबलामध्ये शोधमोहीम
दरम्यान यापूर्वी 11 ऑक्टोबरला सुरनकोटच्या जंगलामध्ये तर 14 ऑक्टोबरला मेंढर जंगल परिसारत दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला होता. मात्र या सर्च मोहिमेमध्ये एकाही दहशतवाद्याला पकडण्यात जवानांना यश आले नाही. आता राजौरीच्या खाबला जंगलामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सैन्य अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. राजौरीमध्ये सैन्यांनी तळ ठोकले आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन सैन्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावेळी त्यांनी जवानांना संबोधित करत, परिसराची पाहाणी देखील केली होती.
Tripura Voilence: 102 Twitter Accounts विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; पोलीस म्हणतात एकाही मशिदीला आग लागली नाही#TripuraRiots #TripuraViolence @INCMaharashtra @NCPspeaks https://t.co/q7cLwd4ZcG
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2021
संबंधित बातम्या
राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत साजरी केली दिवाळी; पहा जेवणासाठी काय केले ऑर्डर?