Kashmir Terrorism : काश्मीरमध्ये 8 दिवसात देशाने 9 वीर सुपूत्र गमावले, पंतप्रधान मोदी शत्रूवर जरब बसवणारा पलटवार कधी?

Kashmir Terrorism : जम्मू भागात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवादी सातत्याने सुरक्षा पथकांना लक्ष्य करतायत. आज डोडा येथे एका एन्काऊंटरमध्ये एक सैन्य अधिकारी, पोलीस आणि चार जवान शहीद झाले. आम्ही आमच्या सैनिकांच्या मृत्यूचा जरुर बदला घेऊ, जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Kashmir Terrorism : काश्मीरमध्ये 8 दिवसात देशाने 9 वीर सुपूत्र गमावले, पंतप्रधान मोदी शत्रूवर जरब बसवणारा पलटवार कधी?
Kashmir Terrorism
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 1:10 PM

जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अतिरेकी सतत सुरक्षा पथकांना लक्ष्य करतायत. डोडाच्या देसा क्षेत्रातील जंगलात सोमवारी रात्री एन्काऊंटर सुरु झालं. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना एक अधिकारी, एक पोलीस आणि चार जवान शहीद झाले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. सुरक्षापथकांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव टाकलाय. सर्च ऑपरेशन सुरु आहे. मागच्या एका आठवड्यातील काश्मीरमधील ही चौथी घटना आहे. दहशतवादी घटना वाढल्याने राजकीय पारा सुद्धा तापला आहे.

जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. “डोडा जिल्ह्यात आमच्या सैन्याचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांवर भेदरट हल्ला झाला. या घटनेने मी दु:खी आहे. आम्ही आमच्या सैनिकांच्या मृत्यूचा जरुर बदला घेऊ. दहशतवाद्यांना त्यांच्या उद्देशात कधी यशस्वी होऊ देणार नाही” असं मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.

भारतीय सैन्याच मोठ नुकसान

भारतीय सैन्याने 14 जुलैला कुपवाडा जिल्ह्यात LOC जवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्याआधी 8 जुलैला कठुआ जिल्ह्यात डोंगराळ भागात सैन्याच्या ताफ्यावर हल्ला झाला. घात लावून हा हल्ला करण्यात आला. यात भारतीय सैन्याच मोठ नुकसान झालं. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ज्यूनियर कमीशन अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले. पाच जवान जखमी झाले.

घुसून वार करण्याची वेळ आली

6 जुलैला कुलगाम जिल्ह्यात दोन एन्काऊंटर झाले. यात सुरक्षा पथकांना मोठ यश मिळालं होतं. सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पण यात दोन जवान शहीद झाले. एकूणच आठवड्याभरातील एन्काऊंटरमध्ये 11 जवानांनी आपले प्राण गमावले. तेच 9 दहशतवादी मारले गेले. काश्मीरऐवजी जम्मू भागाला दहशतवाद्यांनी टार्गेट केलय. या वाढत्या दहशतवादी कारवायांना सीमेपलीकडून म्हणजे पाकिस्तानातून खतपाणी घातल जातय. मागच्या आठ दिवसात या देशाने 9 वीर सुपूत्र गमावले आहेत. त्यामुळे या मागचा मास्टर माइंड जो आहे, तिथे घुसून वार करण्याची वेळ आलीय.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.