मोठी बातमी ! लष्कराचं हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळलं; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडा येथे लष्कराचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी होते. नदीत हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

मोठी बातमी ! लष्कराचं हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळलं; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू
Army Helicopter CrashedImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:39 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे हेलिकॉप्टर येथील चिनाब नदीत कोसळलं असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात जीवित हानी झाल्याचं वृत्त नाहीये. मात्र, नदीत हेलिकॉप्टर कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

ज्या किश्तावाडा परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय तो अत्यंत दुर्गम परिसर असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थांबून थांबून पाऊस पडत होता. या हेलिकॉप्टरमधून लष्कराचे तीन अधिकारी जात होते. पाऊस आणि खराब हवामानामुळे विमान क्रॅश झालं. या अधिकाऱ्यांचं काय झालं? याची काहीच माहिती सुरुवातीला मिळत नव्हती. रेस्क्यू टीम घटनास्थळी पाठवली गेली आहे. तर स्थानिक लोक बचावकार्य करत आहेत.

हे सुद्धा वाचा

दोघे जखमी

भारतीय लष्करानेही या दुर्घटनेची माहिती दिली आहे. हे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळल्याचं लष्कराने म्हटलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक कमांडिंग अधिकारी होता. या दुर्घटनेतील कमांडिंग अधिकारी सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. पायलटला जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. मात्र, दुसऱ्या पायलटचा अजून थांगपत्ता लागलेला नाहीये.

माहिती नाही

हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त कसं झालं याची ठोस माहिती समोर आलेली नाहीये. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असं सांगितलं जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या परिसरात पाऊस होत आहे. हवामान खराब असल्यानेच हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र लष्कराकडून या बाबतची कोणतीही माहिती दिली नाही.

काय आहे खासियत

हे ALH हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टपरमध्ये 12 जवान बसू शकतात. या हेलिकॉप्टरची लांबी 52.1 फूट आणि उंची 16.4 फूट आहे. ध्रुव हेलिकॉप्टरचा अधिकतम वेग ताशी 291 एवढी आहे. हे हेलिकॉप्टर एकावेळी 630 किलोमीटरपर्यंत उड्डान करू शकतं. 20 हजार फुटापर्यंत हे हेलिकॉप्टर जाऊ शकतं. या हेलिकॉप्टरमध्ये कोणतंही हत्यार ठेवलेलं नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.