Jammu and Kashmir | कुपवाड्यात जवान आणि दहशतवादी आमनेसामने, तिघांना कंठस्नान, पण एक अधिकारी आणि तीन जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ माछिल सेक्टर परिसरात जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु आहे (Army killed three terrorist in Kupwara).
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ माछिल सेक्टर परिसरात जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. मात्र, या चकमकीत भारतीय सैन्याचे एक अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले आहेत (Army killed three terrorist in Kupwara).
माछिल सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळील भागात काल (शनवारी) रात्री काही अतिरेक्यांनी घुसखोरी केल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी जाऊन सर्च ऑपरेशन सुरु केलं. या सर्च ऑपरेशनदरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. मात्र, या सर्च ऑपरेशनदरम्यान भारतीय सैन्याचे एक अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले. त्याचबरोबर आणखी एक जवान गंभीर जखमी आहे, अशी माहिती मिळत आहे. या जवानावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
#UPDATE One captain and two soldiers have lost their lives in the ongoing operation in Machil Sector. Three terrorists have been eliminated. Operation underway: Army Sources#JammuAndKashmir
— ANI (@ANI) November 8, 2020
दरम्यान, जवानांना घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांकडे एक एके-47 असॉल्ट रायफळ आणि दोन बॅग मिळाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे घाटी पार करणं अवघड असतं. त्यामुळे त्याआधी अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे (Army killed three terrorist in Kupwara).
याआधी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) पुलवामा जिल्ह्यातील पंपोरे भागात जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा मृत्यू झाला होता. चकमकीदरम्यान, एका स्थानिक नागरिकाचादेखील मृत्यू झाला होता.
#UPDATE Constable Sudip Sarkar lost his life during the operation in Machil Sector. Reinforcements received from Indian Army. Joint operation still underway: Border Security Force (BSF). #JammuAndKashmir https://t.co/M9rZTcaoaO
— ANI (@ANI) November 8, 2020