Rip bipin rawat : रावत यांच्या मृत्यूनंतर अक्षेपार्ह इमोजी पोस्ट केल्याबद्दल बँक कर्मचारी महिला निलंबित
जम्मू-काश्मीरमधील हा प्रकार आहे. या प्रकारावर बँकेने आपल्याकडून स्पष्टीकरण दिले आहेत, त्यात त्यांनी त्या महिलेवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
श्रीनगर : बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जाते आहे. मात्र दुसरीकडे एका बँकेत काम करणाऱ्या महिलेने आक्षेपार्ह इमोजी पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशाच्या डोल्यात पाणी आणलं मात्र दुसरीकडे या महिलेने असे कृत्य केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
महिलेला निलंबित केल्याची बँकेची माहिती
जम्मू-काश्मीरमधील हा प्रकार आहे. या प्रकारावर बँकेने आपल्याकडून स्पष्टीकरण दिले आहेत, त्यात त्यांनी त्या महिलेवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. ते देशाचे पहिले सीडीएस होते. मात्र या महिलेने रावत यांच्याबद्दलच्या पोस्टला संतापजनक इमोजी पोस्ट केला. त्यानंत बँकेने स्पष्टीकरण देत त्या महिलेचे निलंबन केल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.
सोशल मीडियावर घडतात अनेक अनुचित प्रकार
सोशल मीडिया म्हणजे व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असते. तिथे लोक त्यांच्या भावना व्यक्त करतात, काही गोष्टी शेअर करतात. मात्र या मुक्त व्यासपीठाचे काही तोटेही आहेत. जे मोठं नुकासनही करतात. अनेकदा चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहिले आहे. सोशल मीडियामुळे अनेकदा अनेकजण वादातही सापडतात. बिपीन रावत आज अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, त्याआधी त्यांची अंत्ययात्राही निघाली होती, यावेळी हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना अग्नि देताना अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. रावत आणि अधिकाऱ्यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे.