जम्मू काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता शहिदांची नावं दिली जाणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारचं मोठं पाऊल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम भारत सरकारचं एक मोठं पाऊल आहे. ज्यातून प्रगतीशील भारताची 75 वर्ष आणि या काळात लोकांनी मिळवलेलं यशाचा गौरव आहे.

जम्मू काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता शहिदांची नावं दिली जाणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारचं मोठं पाऊल
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जम्मू काश्मीरमधील इमारतींची नावं शहिदांच्या नावावर ठेवली जाणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 3:18 PM

जम्मू आणि काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता देशासाठी शहिद झालेल्या जवानांची आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावं दिली जाणार आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने गुरुवारी यासाठी मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा हा भाग असणार आहे. .यावेळी एका प्रवक्त्यांनी सांगितले की, “लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय परिषदेने शाळा, रस्ते आणि इमारतींची नावं शहीद आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावावर ठेवण्यास मान्यता दिली. हा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमाचा भाग आहे. (Jammu kashmir govt to name several schools roads and government buildings after those who lost their lives for the nation aajadi ka amrut mahotsav)

या बैठकीत उप राज्यपालांचे सल्लागार फारुख खान आणि राजीव राय भटनागर, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता आणि उप राज्यपालांचे प्रधान सचिव नितीश्वर कुमार उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीर सरकारने सांगितले की, “केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलं आहे, त्यांचा आदर आणि सन्मान म्हणून, अनेक पायाभूत सुविधांना राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या लोकांची नावं देण्यात येतील.”

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम भारत सरकारचं एक मोठं पाऊल आहे. ज्यातून प्रगतीशील भारताची 75 वर्ष आणि या काळात लोकांनी मिळवलेलं यशाचा गौरव आहे. हा महोत्सव भारतातील लोकांना समर्पित आहे, ज्यांनी केवळ भारताला विकासाच्या मुख्य प्रवासात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हेच नाही तर पंतप्रधान मोदींच्या भारत 2.0 च्या या स्वप्नाला साकार बनवण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. जे लोक आत्मनिर्भर भारताच्या भावनेने प्रेरित आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक अस्मितेशी जोडलेला आहे. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला होता तो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे.

हेही पाहा:

Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौरा

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.