सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक, उधमपूर भागात जोरदार धुमश्चक्री, एका जवानाला वीर मरण, सर्च ऑपरेशन सुरू
Security forces encounter with terrorists : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन गतिमान करण्यात आले आहे. उधमपूर येथील डुडु-बसंतगड भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत धुमश्चक्री उडाली आहे. त्यात एक जवान शहीद झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन गतिमान करण्यात आले आहे. उधमपूर येथील डुडू -बसंतगड भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत धुमश्चक्री उडाली आहे. त्यात एक जवान शहीद झाला आहे. तर त्यापूर्वी बारामुल्ला परिसरात सैन्य दलाने दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि आयईडी हस्तगत करण्यात आला. पोलिस आणि सुरक्षा दल या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन करत आहे. जम्मू पोलीस सुद्धा सुरक्षा दलांसह या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
या परिसरात चकमक सुरू
जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या डुडु-बसंतगड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सेनाने प्रत्युत्तर दिले. या ठिकाणी लष्कराने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पाकिस्तानचे तीन दहशतवादी असू शकतात. त्यांनी रामनगर क्षेत्रात यापूर्वी गोळीबार केला होता.




थोड्या थोड्या वेळाने या गोळीबार होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात आहे. तर अनेक पोलीसही त्यांच्यासोबत या मोहिमेत सहभागी आहेत.. सध्या काश्मीर खोऱ्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच पहेलगाम घटनेनंतर सातत्याने चकमक उडत आहे.
लष्कराची जोरदार कारवाई
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके सीरीजमधील रायफल्स, चिनी बनावटीचे पिस्तूल, 10 किलोग्रॅम आयईडीसह इतर सामान हस्तगत करण्यात आले आहे. हे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण त्यापूर्वीच त्यांचा खात्मा करण्यात आला.
काल दहशतवाद्यांनी पहलेगाव येथे पर्यटकांना लक्ष्य केले. त्यांनी त्यांचा धर्म विचारला. हिंदू पर्यटक त्यांच्या निशाण्यावर होते. तर त्यांच्या मदतीला आलेल्या एका स्थानिक मुस्लिमावर ही त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात देशभरातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.