Jammu Kashmir: पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने स्वीकारली राकेश पंडितांच्या हत्येची जबाबदारी
बुधवारी रात्री त्रालचे नगरसेवक राकेश पंडिता यांचा मित्र मुश्ताक अहमद याच्या घरी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. या गोळीबारात मुश्ताक यांची मुलगीही गंभीर जखमी झाली. Jammu Kashmir Rakesh Pandita murder
जम्मू-काश्मीर: पुलवामामध्ये भाजप नेते राकेश पंडितांच्या हत्येची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने स्वीकारली. त्यांच्या कॅडरने त्रालमध्ये “फॅसिस्ट हिंदू अतिरेकी” राकेश पंडितांची हत्या केली आहे, असं संघटनेने एका प्रसिद्धीपत्रकात दावा केलाय. बुधवारी रात्री त्रालचे नगरसेवक राकेश पंडिता यांचा मित्र मुश्ताक अहमद याच्या घरी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. या गोळीबारात मुश्ताक यांची मुलगीही गंभीर जखमी झाली. (Jammu Kashmir: People Anti-Fascist Front claims responsibility for Rakesh Pandita murder)
तर अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर अनैतिक कार्यातही सामील
PAFF ने राकेश पंडितांसंदर्भात आपल्या निवेदनात लिहिले आहे की, “हा अतिरेकी केवळ माहिती देणाऱ्यांचे जाळे तयार करण्यातच नव्हे, तर अंमली पदार्थांच्या तस्करी आणि इतर अनैतिक कार्यातही सामील होता. हिंदुत्ववादी गुंडांना असे वाटते की, त्यांची दुष्कृत्ये काश्मीरमध्ये खपवून घेतली जातील, तर ती मोठी चूक आहे. आम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही त्यांचा योग्य प्रकारे काटा काढू. ”
त्यांचे दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) हजर नव्हते
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारावेळी पंडितांसमवेत नेहमीच असलेले त्यांचे दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) हजर नव्हते. गोळी लागल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आणि सुरक्षा दलाने घटनास्थळाला घेराव घातला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.
सर्व पक्षांच्या नेत्यांकडून ‘या’ हत्येचा निषेध
राकेश पंडितांच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीरच्या सर्व पक्षांनी याचा निषेध केला. गेल्या वर्षी जूनमध्ये दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे भाजपाप्रमुख रवींद्र रैना म्हणाले की, पंडितांचे ‘शहीद’ होणे व्यर्थ जाणार नाही. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात रक्तपात केलाय. त्याचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. खोऱ्यात रक्ताची होळी खेळणार्या दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल. ही मानवता आणि काश्मीरियतची हत्या आहे. ”
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचारानेच दु: ख आणलेः मेहबूबा मुफ्ती
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती या घटनेवर म्हणाल्या, “दहशतवाद्यांनी भाजप नेते राकेश पंडिता यांची हत्या केल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. केवळ हिंसाचाराच्या अशा अजाणत्या घटनांमुळे जम्मू-काश्मीरला त्रास झाला. मी त्यांच्या कुटुंबासमवेत शोक व्यक्त करतो. त्यांचा आत्म्याला शांती लाभो. “दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे माजी डेप्युटी सीएम कविंदर गुप्ता म्हणाले की, दहशतवाद्यांना या गोष्टी आवडत नसल्यामुळे भाजपच्या लोकांना लक्ष्य करत आहेत. “या घटना चिंताजनक आहेत. हे खूप चुकीचे आहे. सरकारने दोषींना लवकरच शोधून कारवाई करावी, अशी माझी इच्छा आहे. ”
संबंधित बातम्या
पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते राकेश पंडिता यांचा मृत्यू