Mata Vaishno Devi Stampede | जम्मूमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
जम्मू स्थित माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल सहा जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
जम्मू काश्मीर : जम्मू स्थित माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर 14 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे.
जखमींनवर नारायण रुग्णालयात उपचार
मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त यांच्या माहितीनुसार, माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून प्राथमिक माहितीनुसार 14 जण जखमी झाले आहेत. ही चेंगराचेंगरी अतिशय भीषण ससल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चेंगराचेंगरीचे कारण अस्पष्ट, जवानांकडून बचावकार्य सुरु
माता वैष्णोदेवा मंदिर परिसरात अचानकपे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र या घटनेची माहिती होताच बचाव पथक तसेच जवान यांच्याकडून बचावकार्य केले जात आहे. जखमी भाविकांना मंदिर परिसरातून हलवून रुग्णालयात दाखल केले जात आहे.
तातडीने मदत पोहोचवण्याचे नरेंद्र मोदी यांचे आदेश
तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी घटनास्थळी सर्व प्रकारची मदत तातडीने पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेद्रं मोदी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
#UPDATE | Katra: 6 dead in the stampede at Mata Vaishno Devi Bhawan, exact number not there yet. Their post mortem will be done. Injured being taken to Naraina hospital, total number of injured not confirmed either: Dr Gopal Dutt, Block Medical Officer, Community Health Centre https://t.co/LaOpUdyuCG pic.twitter.com/xtKVnrYGHY
— ANI (@ANI) January 1, 2022
इतर बातम्या :