Jeet Adani Engagement : कोण होणार देशातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत कुटुंबांची सून?

उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरात लवकरच नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. गौतम अदानी यांची होणारी सून आहे तरी कोण?

Jeet Adani Engagement : कोण होणार देशातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत कुटुंबांची सून?
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 7:13 PM

अहमदाबाद : भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी दिवा जमीन शाहसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ मार्च रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दिवा ही C.Dinesh & Co. Pvt.चे हिरे व्यापारी जैमीन शाह यांची मुलगी आहे. लग्न कधी आहे याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

जीत आणि दिवा यांचा साखरपुडा

जीत आणि दिवा यांचा हा साखरपुडा अगदी खाजगी ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्याची माहिती खूप उशिरा समोर आलीये. साखरपुड्याचे काही फोटो समोर आले आहे. साखरपुड्यात दोघांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. गौतम अदानी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी तर धाकट्याचे नाव जीत अदानी आहे. देशातील सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी हिच्याशी करणचे लग्न झाले आहे.

कोण आहे दिवा जमीन शाह?

दिवा जैमीन शाह हिरे व्यापारी जैमीन शाह यांची मुलगी आहे. दिवाचे वडील जैमिन डायमंड कंपनी सी दिनेश अँड को-प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक आहेत. ही कंपनी मुंबई आणि सुरत येथे आहे. त्याची स्थापना चिनू दोशी आणि दिनेश शहा यांनी केली होती. सध्या जिगर दोशी, अमित दोशी, योमेश शहा, जमिन शहा हे या कंपनीचे संचालक आहेत.

जीतचा 2019 मध्ये अदानी समूहात प्रवेश

जीत अदानी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून शालेय शिक्षण घेतले. ते 2019 मध्ये अदानी समूहात सामील झाले आणि सध्या ते ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष आहेत. ते अदानी विमानतळ आणि अदानी डिजिटल लॅबचे नेतृत्व करतात. तर दिवा हिरे व्यापारी जमीन शाह यांची मुलगी आहे. जैमिनची कंपनी सी दिनेश ही चिनू दोशी आणि दिनेश शहा यांनी स्थापन केली होती.

अदानी समूह

रेल्वे, विमानतळांपासून ते बंदरांपर्यंत असे वेगवेगळ्या व्यवसायात अदानी समूहाचे मोठे अस्तित्व आहे. अदानी समूह एप्रिल २०२२ मध्ये २० लाख कोटींच्या मार्केट कॅपसह समूहात सामील झाला. टाटा आणि अंबानींनंतर हे स्थान मिळवणारी ही भारतातील तिसरी कंपनी आहे. अदानी समूहाच्या 10 कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.