VIDEO | पंतप्रधान मोदींनी केलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन; कार्यक्रमात योगींची शेतकरी आंदोलनावर जोरदार टीका
तप्रधान मोदी म्हणाले की, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर भारताचे लॉजिस्टिक गेटवे (logistic gateway) असेल. हे विमानाच्या दुरुस्ती, देखभाल आणि ऑपरेशनचे सर्वात मोठे केंद्र बनेल, ज्यातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.
नोएडाः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातल्या जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Jewar, Noida International Airport) भूमिपूजन केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे, जिथे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळं असतील. नोएडा विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील (National Capital Region) दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज झाले की, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची बरीचशी हवाई वाहतूक नोएडाकडे वळवली जाणार आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा 2023-24 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. ज्यानंतर काही प्रमाणात उड्डाणे सुरू होऊ शकतील.
#WATCH | Noida International Airport will directly connect a major centre of export with international markets. It will enable farmers of this region to export perishable goods like vegetables, fruits, & fish. It will help MSMEs of western UP to reach foreign markets: PM Modi pic.twitter.com/pw54X3GC4t
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2021
हे आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर भारताचे लॉजिस्टिक गेटवे (logistic gateway) असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानाच्या दुरुस्ती, देखभाल आणि ऑपरेशनचे सर्वात मोठे केंद्र असेल. 40 एकर जागेत विमानाची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल करण्याची सुविधा उभारण्यात येणार असून, त्यातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी हब (multi-model connectivity hub) असेल. या विमानतळामुळे 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान सांगितले. येत्या काही दिवसांत येथे 34,000 कोटींहून अधिक गुंतवणूक होणार आहे. जेवर विमानतळ रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि बस सेवेने जोडले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विमानतळाचे सीईओ किरण जैन यांनी सांगितले की, “प्रवाशांच्या सोयीनुसार विमानतळावरील बहुतेक प्रक्रिया डिजिटल असतील. ऑक्टोबर 2024 पर्यंत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याचे लक्ष्य आहे. आम्ही या विमानतळाला शून्य कार्बन उत्सर्जन (net-zero carbon emmission) विमानतळ बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत.” लवकरच अयोध्या येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासह एकूण 17 विमानतळ सुरू करण्याची योजना आखण्यात येणार आहे, असं सांगण्यात येतय.
योगींची विरोधकांवर टीका
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी शेतकरी आंदोलांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी एकेकाळी उसाची शेती पुढे नेण्याची हमी दिली होती, मात्र काही लोकांनी या लोकांच्या गोड आणि चांगल्या स्वभावाचे रूपांतर दंगलीत केले आहे. या परिस्थितीत उत्तर प्रदेश चांगुलपणाला पाठिंबा देणार की दंगलीची योजना आखणाऱ्या जिनांच्या अनुयायांना पाठिंबा देणार, हे आता अवलंबून आहे अशी टीका त्यांनी केली. योगी नाव न घेता, विरोधी पक्षांबद्दल बालत होते ज्यांनी तीन शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकार उत्तर प्रदेशमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन कार्यक्रम करत आहे.
#WATCH | Some people caused a series of riots here. Today, the country has to decide whether it wants to give new wings to the sweetness of sugarcane here or let the followers of Jinnah run riot: UP CM Yogi Adityanath on the occasion of foundation laying of Jewar airport pic.twitter.com/aoCMquUI9w
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2021
इतर बातम्या