झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण; तरुणांना बेरोजगार भत्ताही

हरियाणापाठोपाठ आता झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. (Jharkhand Cabinet Approves 75% Private Sector Job Reservation)

झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण; तरुणांना बेरोजगार भत्ताही
Chief Minister Hemant Soren, Jharkhand
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:53 AM

रांची: हरियाणापाठोपाठ आता झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर आज कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलं असून झारखंड विधानसभा अधिवेशनात त्याबाबतचं विधेयक मांडण्यात येणार असल्याचं हेमंत सोरेन सरकारने स्पष्ट केलं आहे. (Jharkhand Cabinet Approves 75% Private Sector Job Reservation)

हेमंत सोरेन सरकारने आज कॅबिनेटमध्ये तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचा आणि खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 30 हजार रुपये पगार असलेल्या पदांसाठीच खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यात येणार आहे.

मंत्र्यांचा उपचाराचा खर्च सरकार उचलणार

त्याशिवाय मुख्यमंत्री प्रोत्साहन योजनेअंतर्गत तरुणांना बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या आणि कोणताही रोजगार नसलेल्या व्यक्तीलाच हा रोजगार भत्ता देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या भत्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असून भत्ता वाढवण्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच झारखंडचा एखादा मंत्री उपचारासाठी राज्याच्या बाहेर गेल्यास त्याचा खर्च राज्य सरकारने उचलण्याबाबतही सरकारकडून विचार केला जात आहे. तसेच बाहेरच्या राज्यात जाताना एअर अँब्युलन्सची गरज पडल्यास त्याचा खर्चही राज्य सरकार उचलणार आहे.

हरियाणात आरक्षण

हरियाणात तरुणांना खासगी क्षेत्रात 75 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या विधेयकाला राज्यपालांनीही सहमती दर्शवली आहे. याबाबतचं नोटिफिकेशन लवकरच काढल्या जाईल आणि विधेयक पुढे सरकवलं जाईल, असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं होतं. तर खासगी क्षेत्रात 75 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्यात आल्याने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे, आज राज्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, असं उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सांगितलं होतं.

वर्षभरापासून हालचाली

गेल्या वर्षीच 5 नोव्हेंबर रोजी हरियाणा विधानसभेत खासगी क्षेत्रात भूमीपुत्रांसाठी 75 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी जननायक जनता पार्टीचं निवडणूक आश्वासन पूर्ण झालं होतं. 50 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची ही तरतूद आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. (Jharkhand Cabinet Approves 75% Private Sector Job Reservation)

संबंधित बातम्या:

भूमिपुत्रांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण, विधेयक मंजूर; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

Video : गुजरातमध्ये स्थानिक निवडणूक निकालावेळी जोरदार राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मालमत्ता किती? जाणून घ्या…

(Jharkhand Cabinet Approves 75% Private Sector Job Reservation)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.