Jharkhand ED Action : झारखंडमधील IAS पूजा सिंघल यांच्या CA कडे मिळालं घबाड! तब्बल 17 कोटींची कॅश, पैसे मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

IAS पूजा सिंघल यांच्या जवळच्या CA च्या घरात तब्बल 17 कोटी रुपये रोख आणि 8 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही रक्कम पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चक्क पैसे मोजायचं मशीनच आणलं.

Jharkhand ED Action : झारखंडमधील IAS पूजा सिंघल यांच्या CA कडे मिळालं घबाड! तब्बल 17 कोटींची कॅश, पैसे मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन
झारखंडमधील IAS पूजा सिंघल यांच्यावर ED ची धाडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 8:22 PM

नवी दिल्ली : अवैध खाण प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय  अर्थात ईडीने (Enforcement Directorate) शुक्रवारी पहाटे देशभरात छापेमारी केली. झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) आणि त्यांच्याशी संबंधित 20 ठिकाणी ईडीने छापेमारी केली. या छापेमारीत मोठं घबाड मिळालं आहे. पूजा सिंघल यांच्या जवळच्या CA च्या घरात तब्बल 17 कोटी रुपये रोख आणि 8 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही रक्कम पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चक्क पैसे मोजायचं मशीनच आणलं. दरम्यान, रोख रक्कम मिळाल्याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून (ED Officers) अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना बिहारमधील मधुबनीमधून अटक करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या पथकानं झारखंडमधील रांची, धनबाद, खुंटी, राजस्थानमधील जयपूर, हरियाणातील फरिदाबाद आणि गुरुग्राम, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बिहारमधील मुझफ्फरपूर आणि दिल्ली-एनसीआरमध्ये एकाचवेळी छापे टाकले होते. त्यात रांचीमध्ये पंचवटी रेसिडेन्सी, चांदणी चौक, कानके रोड, हरिओम टॉवरमधील नवीन इमारत, लालपूर, पल्स रुग्णालय, बरियातू मधील ब्लॉक क्रमांक 9 चा समावेश आहे. पल्स रुग्णालय हे पूजा सिंघल यांचे पती आणि व्यापारी अभिषेक झा यांच्या मालकीचं आहे. IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानावरही छापे टाकल्याची माहिती मिळतेय. या संपूर्ण प्रकरणावर ईडीकडून काय अधिकृत माहिती देण्यात येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

CA सुमन कुमार म्हणतात ती रक्कम माझी!

महत्वाची बाब म्हणजे ज्यांच्या घरी 17 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली ते CA सुमन कुमार यांनी 17 कोटी रुपये हे त्यांच्या मालकीचे असल्याचं सांगत ते पुढील आर्थिक वर्षात दाखवायचे होते असं म्हटलंय. मात्र, इतकी मोठी रक्कम कुठून आली आणि ती घरात का ठेवली? याचं उत्तर त्यांना देता आलं नाही.

ईडीकडून काहींना अटक

IAS पूजा सिंघल यांचे पती अभिषेक यांच्या घरावरही छापेमारी सुरु आहे. IAS अधिकारी राहुल पुरवार यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पूजा सिंघल यांनी अभिषेक यांच्यासोबत लग्न केलं होतं. ईडीचं पथक अभिषेक यांच्या रातू रोडवरील घरीही तपास करत आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आतापर्यंत काहींना अटक केल्याचीही माहिती मिळतेय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.