आंदोलनाचा फटका, एकाच रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाडी 11 तास थांबली, जेवणही संपले, पाणी मिळणेही अवघड
jhelum express: झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अनेक तास ट्रेनमध्येच बसून राहावे लागले. ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ आणि पाणी मिळणेही प्रवाशांना अवघड झाले. जम्मू-काश्मीर जाणारे प्रवासी झेलम एक्स्प्रेसला झालेल्या खोळंबामुळे गाडीत अडकून पडले होते.
Jhelum Express: पंजाबमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका देशभर जाणवू लागला आहे. या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुण्यावरुन जम्मूला जाणाऱ्या झेलम एक्स्प्रेसला बसला आहे. शेतकरी आंदोलनामुळे ही एक्स्प्रेस पंजाबमधील जालंधर कँट या रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली. एक, दोन तास नव्हे तर तब्बल ११ तास एकाच ठिकाणी ही गाडी थांबली होती. त्यावेळी रेल्वेतील अनेक प्रवाशांकडे जेवणही नव्हते. पाणी संपले होते. अनेक अडचणींना रेल्वे प्रवाशांना सामोरे जावे लागले.
पुण्यावरुन २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.४० वाजता झेलम एक्स्प्रेस निघाली. ही गाडी जालंधर कॅक रेल्वे स्थानकावर सकाळी ७.२० वाजता पोहचली. त्या गाडीची पोहचण्याची वेळी सकाळी ५.१० होती. जालंधरला पोहचल्यावर दुपारी चार वाजेपर्यंत झेलम एक्स्प्रेस जालंधर रेल्वे स्थानकावर थांबवली गेली. तब्बल ११ तास ही ट्रेन लेट झाल्यानंतर निघाली.
झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अनेक तास ट्रेनमध्येच बसून राहावे लागले. ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ आणि पाणी मिळणेही प्रवाशांना अवघड झाले. जम्मू-काश्मीर जाणारे प्रवासी झेलम एक्स्प्रेसला झालेल्या खोळंबामुळे गाडीत अडकून पडले होते.
११ तास रेल्वेला उशीर
जालंधरजवळ झेलम तब्बल ११ तास थांबून होती. त्यानंतरही रेल्वेकडून प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाही. शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे थांबल्याचे सांगण्यात आले. परंतु रेल्वे कधी मार्गस्थ होणार त्याची माहिती प्रवाशांना दिली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सोबत आणले खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी संपल्यावर प्रवासी हैराण झाले होते. तब्बल ११ तासनंतर उशीर झाल्यानंतरत झेलम एक्स्प्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
रेल्वेत जेवण मिळणे अवघड
झेलम एक्स्प्रेसमध्ये लष्कराचे जवान होते. ते कर्तव्यावर जात होते. त्यांच्यासाठीही काहीच पर्यायी सुविधा करण्यात आली नाही. प्रवाशी आणि लष्करातील जवानांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. रेल्वेतील प्रवाशी अमित म्हणाले, मी जम्मूवरुन शिर्डीला गेलो होतो. आता घरी परत येत असताना जालंधर कँटवर रेल्वे थांबवण्यात आली. रेल्वेत शाकाहारी जेवण मिळणे अवघड झाले होते. माझ्यासोबत लहान मुलेही होती. त्यांच्या जेवणाची सोय करणे खूपच अवघड गेले.