सरकारने मॅपिंग पॉलिसीमध्ये केला मोठा बदल, आता मिळेल 22 लाखांहून अधिक नोकऱ्यांची संधी
भारतीय कंपन्यांसाठी हे बदल करण्यात आले असून आता खासगी कंपन्या कोणत्याही परवानगीशिवाय सर्वेक्षण आणि मॅपिंग करू शकतात.
नवी दिल्ली : ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला आणखी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशाच्या मॅपिंग पॉलिसीमध्ये (Mapping Policy) मोठे बदल जाहीर केले आहेत. यामध्ये भौगोलिक (Geospatial) डेटासंबंधी नियम बदलण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांसाठी हे बदल करण्यात आले असून आता खासगी कंपन्या कोणत्याही परवानगीशिवाय सर्वेक्षण आणि मॅपिंग करू शकतात. या माहितीचा वापर लॉजिस्टिक्स, वाहतूक, रस्ता सुरक्षा आणि ई-कॉमर्स क्षेत्रात वापरला जाऊ शकतो. (job news govt liberalizes a mapping policy here know all about new move)
या नवीन धोरणांतर्गत, सर्वेक्षण आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था अशा अनेक सरकारी संस्थांचा डेटाही सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांना वापरता येणार आहे. यामधून ‘डिजिटल इंडिया’ला चालना देण्यात येईल असंही सरकारने म्हटलं आहे.
आत्मनिर्भर भारतासाठी मोठा निर्णय
पीएम मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी या महत्त्वाचा निर्णय सरकारकडून देण्यात आला आहे. या सुधारणांमुळे देशातील स्टार्टअप्स, खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील आणि संशोधन संस्थांमधील नाविध्ये नवीन कामास प्रोत्साहन मिळेल. यामुळे रोजगार निर्मिती देखील होईल आणि आर्थिक विकासाला गती देखील मिळेल.
2.2 मिलियन लोकांना रोजगार मिळेल
केंद्र सरकारच्या या नव्या मॅपिंगमुळे भारतातील अनेक संस्थांना जिओस्पॅटीअल डेटा आणि जिओस्पाटियल सर्व्हिसेससह कोणत्याही प्रकारचे परवाना घेण्याची आवश्यकता नाही. इतकंच नाही तर नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे या क्षेत्रामध्ये तब्बल 1 लाख कोटी रुपयांना चालना देण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. तर यातून 2.2 दशलक्ष लोकांना रोजगार मिळेल असंही सरकारने म्हटलं आहे.
काय आहे मॅपिंग पॉलिसी ?
मॅपिंग पॉलिसी असा नियम आहे, ज्याअंतर्गत मॅपिंगचा डेटा वापरू शकता. यासाठी काही नियमावली सुद्धा आहे. सरकारने आता या नियमांमध्ये बदल केला असून यानुसार सरकारी कंपन्यादेखील या मॅपिंग आणि डेटाचा वापर करू शकतात. (job news govt liberalizes a mapping policy here know all about new move)
संबंधित बातम्या –
Gold/Silver Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त की महाग? वाचा ताजे दर
SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?
Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर
(job news govt liberalizes a mapping policy here know all about new move)