कानपूर – कानपुरात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ 50 किलोमीटर अंतरावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात सहभागी होते. तर दुसरीकडे कानपुरात रस्त्यावर उद्रेक सुरु होता. कानपुरात पैगंबराबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर कानपुरात दगडफेक आणि गोळीबार सुरु होता. या सगळ्या हिंसाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी 12 पोलीस ठाण्यातील पोलीस एकवटले होते, या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली आहे. सात जण यात जखमी झाले आहेत. तर हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Violence, massive stone pelting in UP’s Kanpur. This happening on the day when top investors of the country are attending ground breaking ceremony in UP to explore investment opportunities. pic.twitter.com/fK0qu0lKPA
हे सुद्धा वाचा— Piyush Rai (@Benarasiyaa) June 3, 2022
एका भाजपा नेत्याने मोह्हमद पैंगबर यांच्याविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागात बंद पुकारण्यात आला होता. पोलिसांच्या सुरक्षेतच जुम्म्याची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी जमा झाली, त्यानंतर दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. त्याला विरोध झाल्यानंतर दगडफेक करण्यात आली, काही ठिकाणी हवेत गोळीबाराच्याही घटना घडल्या. 4 तास रस्त्यावर हा हिंसाचार सुरु होता. गर्दीला अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या कानपुरात तणाववूर्ण शांतता आहे.
जौहर फॅन्स असोसिएशन आणि अन्य मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी मुस्लीम समुदायाला बंदचे आवाहन केले होते. या बंदला मोठा पाठिंबा पाहावयास मिळाला. कानपूर परिसरात असलेले चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हीरामन पुरावा, दलेल पुरावा, मेस्टन रोड, बाबू पुरवा, रावतपुरा या सर्व भागात काही अंशी तर काही ठिकाणी पूर्ण बंद पाळण्यात आला.
जुम्म्याच्या नमाजावेळी मशिदींमध्ये झालेल्या संभाषणात मोहम्मद पैगंबराबाबतचे वादग्रस्त वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला. पोलिसांनी शहरातील कुठल्याही भागात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती. नमाजानंतर अनेक ठिकाणी, चौकांमध्ये गर्दी एकवटली होती. पोलिसांनी या गरदीला समजावून ती पांगवण्याचा प्रयत्न केला.
भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी ज्ञानवापी मुद्द्यावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैंगबराबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.