India Canada Row : अंगाशी आल्यावर जस्टिन ट्रूडो बिथरले, भारताचा लगेच पलटवार
India Canada Tension : जस्टिन ट्रूडो यांच्या कबुलनाम्यावर भारताने पलटवार केला आहे. भारताबरोबर जे संबंध बिघडले, त्याला एकटे ट्रूडो जबाबदार आहेत. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. जस्टिन ट्रूडो यांनी आता काय कबुली दिली आहे? भारताने लगेच संधी साधत पलटवार केला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. भारतावर इतके गंभीर आरोप करुन त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. स्वत: जस्टिन ट्रूडो यांनी याची कुबली दिली आहे. हरदीप सिंह निज्जर हत्याकांड प्रकरणात जस्टिन ट्रू़डो यांनी कबूलनामा देताच भारताने पलटवार केला आहे. ‘पीएम ट्रूडो यांनी जी गोष्ट मान्य केली, तेच आम्ही नेहमी बोलत होतो’, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. “कॅनडाने आमच्यावर जे गंभीर आरोप केले होते, त्या संदर्भात त्यांना एकही पुरावा सादर करता आला नाही” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल म्हणाले. पीएम ट्रूडो यांच्या आरोपांमुळे भारत-कॅनडाचे जे संबंध बिघडले, त्याला एकटे ट्रूडो जबाबदार आहेत.
जस्टिन ट्रूडो यांचं असं म्हणणं आहे की, “हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणात मी केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर बोललो. कुठलेही ठोस पुरावे नव्हते” या प्रकरणात भारताने सुरुवातीपासून कॅनडाचे दावे नाकारले आहेत. ट्रूडो यांची वक्तव्य राजकारणाने प्रेरित आहेत, असं भारताने म्हटलं आहे. ट्रूडो यांनी असे वाट्टेल ते आरोप करुन, भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
मग, कुठल्या आधारावर कॅनडा हे बोलत होता
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे सर्व आरोप नेहमीच फेटाळले आहेत. भारताने जस्टिन ट्रूडो यांच्यावर मतपेटीच राजकारण केल्याचा आरोप केला आहे. आम्ही याबद्दल कॅनडाकडे नेहमीच पुरावे मागितले, पण कॅनडाने पुरावे दिले नाहीत. फक्त इंटलीजन्स इनपुट दिले. त्याचा आधारावर कॅनडाने आमच्यावर आरोप केले, असं भारताच म्हणणं आहे.
भारताने काय Action घेतली?
भारताने कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडायला सांगितला. 19 ऑक्टोंबरपर्यंत त्यांना देश सोडावा लागणार आहे. भारताने कॅनडातून आपल्या उच्चायुक्तांनाही परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणात भारत सरकारचे एजंट सहभागी असल्याचा आरोप मागच्यावर्षी जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. मागच्यावर्षी जून महिन्यात ब्रिटिश कोलंबियाच्या सरेमध्ये निज्जरची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती.