Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanishq Advertisement : ‘तनिष्क’वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरात वादात आता अभिनेत्री कंगना रनौतने उडी घेतली आहे. तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीतून लव्ह जिहादसारख्या प्रकाराला चालना दिल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. (Kangana ranaut angry over tanishqs advertisement)

Tanishq Advertisement : 'तनिष्क'वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 7:26 PM

मुंबई : तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरात वादात आता अभिनेत्री कंगना रनौतने उडी घेतली आहे. तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीतून लव्ह जिहादसारख्या प्रकाराला चालना दिल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे ‘तनिष्क’ने ही जाहिरात यूट्यूबवरुन हटवली आहे. तनिष्कच्या या जाहिरातीवर कंगनानेही विरोध दर्शवला असून ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. (Kangana ranaut angry over tanishqs advertisement)

या जाहिरातीबाबत कंगना म्हणाली, “एका मुस्लिम कुटुंबात एका हिंदू धर्माच्या मुलीचे लग्न होते. मुलगी आपल्या सासूला घाबरलेल्या आवाजात विचारत आहे की, हा विधी इथे मानला जात नाही, मग पुन्हा असं का होत आहे? ती त्या घरातली नाही का? तिला हे का विचारायचे आहे. ती स्वत: च्या घरात इतकी गोंधळलेली का दिसत आहे”. कंगना इथेच थांबली नाही. तर तिने या विषयावर आणखी दोन ट्विट केले. ही जाहिरात अनेक अर्थांनी चुकीची आहे. या जाहिरातीमध्ये केवळ लव्ह जिहादलाच प्रेरणा दिली जाते असं नाही तर लिंगभेदालाही प्रोत्साहन दिले जात आहे”.

तनिष्क ज्वेलर्स ट्रोल

तनिष्क ज्वेलर्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. तनिष्क ज्वेलर्सने त्यांच्या एका जाहिरातीमध्ये लव्ह जिहादसारख्या गोष्टींना प्रसिध्दी दिल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर याचा प्रचंड निषेध करण्यात येत आहे. या ट्रोलिंगनंतर तनिष्क ज्वेलर्स आपली जाहिरात मागे घेतली आहे.

या व्यतिरिक्त कंगनाने हिंदू धर्मातील लोकांना इशारा दिला

एक हिंदू म्हणून आपण आपल्या मनोवृत्तीत असे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या या कलात्मक शैलीपासून आपणही दूर राहिले पाहिजे. आपण आजूबाजूच्या प्रत्येक विचारांची तपासणी करणे आणि अशा विचारसरणीचा आपल्यावर किती प्रभाव पडू शकतो आणि आपण आपले किती नुकसान करु शकतो. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे. हा एकमेव मार्ग आहे. ज्याद्वारे आपण आपली संस्कृती वाचवू शकतो, असंही कंगनाने नमूद केलं. (Kangana ranaut angry over tanishqs advertisement) जाहिरातीता नेमकं काय आहे ?

तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीत, एका हिंदू महिलेचे मुस्लिम घरात लग्न झाल्याचे दाखवले आहे. महिलेला दिवस गेल्याने तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीत मुस्लिम परिवार हिंदू धर्मपद्धतीनुसार डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतो. शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला “मां ये रस्म तो आपके घर में होती भी नहीं है न?” असा प्रश्न करते. यावर सासू, “पर बिटिया को खुश रखने की रस्म तो हर घर में होती है न?” असे उत्तर देते. याच जाहिरातीविरोधात सोशल मीडियावर तनिष्क ज्वेलर्सला बॉयकॉट करा, असा ट्रेन्ड चालवला जातोय.

हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरुन जनतेने तनिष्क ज्वेलर्सच्या या जाहिरातीला नापसंद केलं आहे. तसेच, या जाहिरातीतून लव्ह जिहादचा प्रचार केला जातोय, असा आरोप सोशल मीडियावर होत आहे. तनिष्कने घडणावळ केलेल्या दागिन्यांना खरेदी न करण्याचे आवाहनही ट्विटरवरुन केले जात आहे.

संबंधित बातम्या :

तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीवरुन वाद, सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर जाहिरात हटवली

सोनिया सेना बाबरसेनेपेक्षा वाईट, कंगनाचा शिवसेनेसह ठाकरे सरकारवर हल्लाबोल

TRP Scam : बजाजपाठोपाठ पारलेचा मोठा निर्णय, TRP घोटाळ्यातील न्यूज चॅनेलला जाहिराती नाही

(Kangana ranaut angry over tanishqs advertisement)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.