What India Thinks Today : कंगना सांगणार क्रिएटिव्हिटीचा फंडा; आजच तारीख बुक करा
बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत गेल्या दोन दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. अभिनयात अमिट ठसा उमटवल्यानंतर आता ती दिग्दर्शनातही हात मारणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या कॉन्क्लेव्हमध्ये कंगना राणावत येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यातील एका परिसंवादात कंगना भाग घेणार आहे. त्यामुळे कंगना काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली | 23 फेब्रुवारी 2024 : आता अवघ्या काही तासांवरच व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीट येऊन ठेपली आहे. टीव्ही9 नेटवर्कने ही कॉन्क्लेव्ह आयोजित केली आहे. कॉन्क्लेव्हचं हे दुसरं पर्व आहे. याची सुरुवात 25 फेब्रुवारीपासून होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंतचे दिग्गज सहभागी होणार आहेत. एवढेच नव्हे तर बॉलिवूड क्वीन कंगना राणावतही या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. त्यामुळे कंगना काय बोलणार याकडेही संपूर्ण देशाचं आणि बॉलिवूडचं लक्ष लागलं आहे.
कंगना राणावत बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरस्थावर झाली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये कंगनाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगेना एक अनुभवी अभिनेत्री आहे. टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमधील फायरसाईट चॅट क्रिएटिव्हिटी : वर्ल्ड इज माय ओएस्टर या एका परिसंवादात ती भाग घेणार आहे. कंगनाचा हा कार्यक्रम कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी कंगना क्रिएटिव्हिटीवर भाष्य करणार आहे.
या सिनेमापासून सुरूवात
कंगनाने 2006 पासून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तिला पदार्पणातच बेस्ट डेब्यूसाठीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर तिने वो लम्हे, लाइफ इन अ मेट्रो, राज, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, नो प्रॉब्लम, तनु वेड्स मनु, क्वीन, रिवॉल्वर रानी, सिमरन, मणिकर्णिका, पंगा और टीकू वर्सेज शेरू आदी सिनेमात काम केलं आहे. तिला चार सिनेमांसाठी आतापर्यंत नॅशनल अॅवार्ड मिळालेला आहे. तसेच तिला पद्मश्री देऊन गौरविण्यात आलेलं आहे.
कंगना तिच्या बिनधास्त विधानांमुळे आणि रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सतत अॅक्टिव्ह असते. कंगना जाहीरपणे राजकीय भूमिकाही घेते. त्यामुळे ती अनेकदा ट्रोलही होत असते. सध्या ती एका मोठ्या सिनेमात काम करत आहे. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारीत एमर्जन्सी सिनेमात ती मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमात ती अभिनय तर करतच आहे, शिवाय ती या सिनेमाचं दिग्दर्शनही करत आहे.