Covid Updates: कर्नाटकातील SDM मेडिकल कॉलेज सील, 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
नुकत्याच झालेल्या महाविद्यालयीन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी केली गेली आहे. मात्र, विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर गेले होते का आणि ते बाहेर कोणाकोणाला भेटले आहेत, याचा तपास केला जात आहे.
कर्नाटकातील धारवाडमध्ये (Karnataka, Dharwad) एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SDM college of Medical Sciences) आज 66 हून अधिक विद्यार्था कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने कॉलेज आणि वसतिगृह सील केले गेले. या सर्व 66 विद्यार्थ्यांचं करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोसघेऊन लसीकरण पूर्ण झालेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एसडीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे तेव्हा लक्षात आले जेव्हा प्रोटोकॉल म्हणून कॉलेज कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली गेली. एकूण 400 विद्यार्थ्यांपैकी, 300 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली गेली होती.
कॉलेज परिसराच्या बाहेर कोणीही पडू शकणार नाही
जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपायुक्तांच्या आदेशानंतर, महाविद्यालयातील दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत आणि सर्व वर्ग निलंबित करण्यात आले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर वसतिगृहातच उपचार केले जातील, असे धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले की, “उर्वरित 100 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली जाईल. विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केले आहे आणि दोन वसतिगृहे सील केली आहेत. विद्यार्थ्यांना उपचार आणि जेवण जागीच दिले जाईल आणि कोणालाही वसतिगृहातून बाहेर पडू दिले जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे रिपोर्ट बाकी आहेत त्यांनाही आवारात क्वारंटाईन केले गेले आहे.”
काही संक्रमित विद्यार्थ्यांना खोकला आणि ताप आहे तर काहींना सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. नुकत्याच झालेल्या महाविद्यालयीन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी केली गेली आहे. मात्र, विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर गेले होते का आणि ते बाहेर कोणाकोणाला भेटले आहेत, याचा तपास केला जात आहे.
सध्या भारतात कोविडची परिस्थिती नियंत्रणात असली तरीही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
इतर बातम्या