नववीतल्या मुलीने दिला बाळाला जन्म, बातमी ऐकून राज्य हादरलं!
एका धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. एका नववी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण सुन्न झाला आहे. पोलिसांनीदेखील या प्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
बंगळुरु | 12 जानेवारी 2024 : कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नववी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर कर्नाटकात एकच चर्चा सुरु आहे. तसेच देशातही या प्रकरणाची आता चर्चा होऊ लागली आहे. याप्रकरणी पोलीस आणि समाज कल्याण विभागाकडूनदेखील तपास सुरु आहे. ही मुलगी कर्नाटकच्या चिक्कबल्लापूरमध्ये एका वसतिगृहात राहायची. पण ती अधुनमधून नातेवाईकांच्या घरी राहायला जाते सांगून वसतिगृहात न राहता दुसरीकडे राहायची. संबंधित प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच मुलगी राहत असलेल्या वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात आलं आहे.
संबंधित मुलगी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. पण ती वसतिगृहात नियमित राहायची नाही. ती आपल्या नातेवाईकांना भेटायला जायचं सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडायची. गेल्या काही दिवसांपासून ती वसतिगृहात आली नव्हती. त्यानंतर आता तिने एका बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलीचं दहावीच्या मुलासोबत होतं कनेक्शन
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मुलीचं मेडिकल चेकअप झालं होतं. पण त्यावेळी तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा झाला नव्हता. त्यामुळे कुणाचं या प्रकरणाकडे लक्ष गेलं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी एक वर्षापूर्वीच संबंधित वसतिगृहात वास्तव्यास आली होती. त्यावेळी ती इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलीचं 10वीच्या विद्यार्थ्यासोबत कनेक्शन होतं. दोन्ही एका शाळेत शिकायला होते. दहावीच्या शिक्षणानंतर मुलाने ट्रान्सफर सर्टिफिकेट घेतलं आणि तो बँगलोरला राहायला गेला.
पोलिसांकडून तपास सुरु
समाज कल्याण विभागाचे जॉईंट डायरेक्टर कृष्णप्पा एस यांनी या प्रकरणाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुलगी अनेक दिवसांपासून वसतिगृहात येत नव्हती. ती बागेपल्ली शहराची रहिवीसी आहे. ती पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात गेली होती. तेव्हा तिला ती गर्भवती असल्याची माहिती मिळाली”, असं कृष्णप्पा एस यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. “आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत. आम्ही आमचा तपास अहवाल सरकारकडे सादर करु”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.