कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचे मोफत कार्ड

कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत काँग्रेस यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेला तीन आश्वासने दिली आहेत.

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचे मोफत कार्ड
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:07 PM

बेंगळुरु : कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका (karnataka assembly election) होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करत आहे. त्याचवेळी काँग्रेसनेही निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मोफत योजनेचे कार्ड काढले आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले की, पक्षाने निवडणुकीसंदर्भात तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोफत तांदूळ, मोफत वीज अन् दर महिन्याला दोन हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. आता या घोषणा काँग्रेसला विजयापर्यंत नेतील का? हे भविष्यातच स्पष्ट होणार आहे.

10 किलो तांदूळ मोफत 

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार म्हणाले की, काँग्रेसने बीपीएल कार्डधारकांना 10 किलो तांदूळ मोफत देण्याचे तिसरे वचन जाहीर केले आहे. यापुर्वी दरमहा २०० युनिट मोफत वीज देण्याची आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाला दरमहा २०० रुपये देण्याची दोन आश्वासने दिली होती.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस वाटणार गँरंटी कार्ड

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस गँरंटी कार्डचे वाटप करणार आहे. काँग्रेस या कार्डमध्ये लोकांना मोफत वीज आणि महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याचे आश्वासन देत आहे. साहजिकच काँग्रेस कर्नाटकात मोफत रेवड्याच्या राजकारणावर काँग्रेस काम करत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या रेवड्या चालल्या नव्हत्या.

कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत काँग्रेस यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेला तीन आश्वासने दिली आहेत.

मोदी यांच्या सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.