कर्नाटक निवडणूक सर्व्हे, कोणता पक्ष मारणार बाजी?

| Updated on: Apr 15, 2023 | 2:07 PM

2018 च्या निवडणुकीत कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला 104 जागा मिळाल्या होत्या. आता 2023 मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार का? विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे सरकार येणार? हे 13 मे रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु त्यापूर्वी ओपिनिअन पोल आला आहे.

कर्नाटक निवडणूक सर्व्हे, कोणता पक्ष मारणार बाजी?
Karnataka Election
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बंगळरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात सध्या भाजपकडे 117, काँग्रेसकडे 69, जेडीएसकडे 32 आणि इतरांकडे सहा जागा आहेत. आता पुन्हा भाजप सत्तेवर येणार का? या प्रश्नाचे उत्तर 13 मे रोजी मिळणार आहे. परंतु त्यापूर्वी एका सर्व्हेचा अंदाज आला आहे. हा अंदाज कोणासाठी दिलासादायक आहे पाहूया

काय आहे सर्व्हेचा अंदाज


जन की बात आणि एशियानेट यांनी ओपनियन पोल जाहीर केला. त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष होणार आहे. या पक्षाला 98 ते 109 जागा मिळणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये बहुमतासाठी चांगला संघर्ष आहे. काँग्रेसला 89 ते 97 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. या पक्षाला 25 ते 29 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार आहे. बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे. म्हणजेच या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकात त्रिशंकू सरकार येणार आहे. यामुळे अपक्ष व छोट्या पक्षांची मागणी वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

2018 मध्ये काय झाले होते

2018 च्या निवडणुकीत कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला 104 जागा मिळाल्या होत्या.काँग्रेसला 81 तर अन्य पक्षाला 37 जागा मिळाल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमत नव्हते. यामुळे सुरुवातीला काँग्रेस अन् जेडीएसचे सरकार सत्तेवर आले. परंतु ऑपरेशन लोटसनंतर 2019 मध्ये हे सरकार पडले आणि भाजप सरकार सत्तेवर आले.

भाजपला धक्का

कर्नाटक विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे दिग्गज नेता केएस ईश्वरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. ईश्वरप्पा यांनी मंगळवारी आपण आता कोणत्याही निवडणूकीला उभा राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपण राजकारणातून आता बाजूला होत आहोत. पार्टीने मला ४० वर्षांत अनेक जबाबदाऱ्या दिल्या. अगदी बूथ इनचार्ज ते प्रदेश अध्यक्ष पर्यंतचा हा प्रवास आपण केला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री बनन्याचे भाग्य मला लाभले असे म्हटले आहे.

ईश्वरप्पा जून महिन्यात 75 वर्षांचे होणार आहेत. भाजपामध्ये निवडणूका लढण्याचे आणि सरकारी पद धारण करण्याचे त्यांचे वय उलटले आहे. अर्थात काही अपवाद राहीले आहेत.

हे ही वाचा


निवडणुकीपूर्वी आली कोट्यवधींची रोकड, मद्य अन् भेटवस्तू