कर्नाटक निवडणुकीत लिंगायत समाजाचे काय आहे महत्व, कोणाकडे जाणार हा समाज

राज्यातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली लिंगायत समाज आहे. हा समाज गेल्या 100 वर्षांपासून काँग्रेसशी जुळलेला आहे.

कर्नाटक निवडणुकीत लिंगायत समाजाचे काय आहे महत्व, कोणाकडे जाणार हा समाज
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 6:04 PM

बेंगळुरु : कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका (karnataka assembly election) होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस आणि जेडीएस सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी लिंगायत समाजाचे महत्व खूप मोठे आहे. कर्नाटकात प्रभावशाली लिंगायत समाजाची मते काँग्रेसच्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. मुंबई-कर्नाटक म्हणजेच आताचा कित्तूर हा भाग लिंगायतांचा बालेकिल्ला आहे. ज्यामध्ये 56 विधानसभा जागा आहेत आणि गेल्या दोन दशकांमध्ये भाजपच्या विजयात हा प्रमुख घटक आहे.

लिंगायत समाज किती महत्वाचा

राज्यातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली लिंगायत समाज आहे. हा समाज गेल्या 100 वर्षांपासून काँग्रेसशी जुळलेला आहे. 1924 मध्ये बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तेव्हापासून हा समाज काँग्रेसच्या मागे आहे. 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. तेव्हापासून ते तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींपर्यंत सर्वांनी लिंगायत समाजाला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 1956 मध्ये कर्नाटकचे एकीकरण झाल्यानंतरही 1969 मध्ये पक्षाचे विभाजन होईपर्यंत लिंगायतांचे वर्चस्व होते.

काँग्रेस अन् लिंगायत समाज

1956 मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेमुळे लिंगायत राजकारणाचा विस्तार झाला. 1973 मध्ये नवीन म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे करण्यात आले. 1956 ते 1971 या काळात वोक्कलिगांसह लिंगायतांनी काँग्रेसच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले. लिंगायत समाजातील बीडी जट्टी, एस निजलिंगप्पा, एसआर कंठी आणि वीरेंद्र पाटील हे त्यानंतरचे मुख्यमंत्री होते.

1969 मध्ये काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे लिंगायतांना वेगळी दिशा मिळाली. एस निजलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखालील समाज इंदिरा काँग्रेसपासून फारकत घेऊन जुन्या काँग्रेसकडे वळला होता. कदाचित एखादी धोरणात्मक चूक झाली असेल ज्यामुळे समाजाने सत्तेच्या खेळात आपले वर्चस्व गमावले असेल.

येदियुरप्पा यांचा प्रभाव

लिंगायत समाजातील प्रभावशाली नेता व माजी मुख्‍यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे काँग्रेस या ठिकाणी आपली शक्ती खर्च करत आहे. भाजप लिंगायत समाजादील प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जे भाजपमधून बाहेर पडले आहे, त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मोदी यांच्या सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.