Karnataka Election : रणसंग्राम सुरू ! कर्नाटक विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतदान कधी? निकाल कधी?; वाचा एका क्लिकवर

कर्नाटका विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर घोषित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Karnataka Election : रणसंग्राम सुरू ! कर्नाटक विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतदान कधी? निकाल कधी?; वाचा एका क्लिकवर
Karnataka Poll scheduleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:28 PM

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे कर्नाटकात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात सध्या भाजपकडे 117, काँग्रेसकडे 69, जेडीएसकडे 32 आणि इतरांकडे सहा जागा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाची सरशी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कर्नाटकात एकूण 5,21,73,579 मतदार आहेत. त्यात 100 हून अधिक वयाचे 16 हजाराहून अधिक मतदार आहेत. येत्या 24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांना घरून मतदान करता येणार

कर्नाटक निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार आहे. कर्नाटकात एकूण 9.17 लाख नवीन मतदार आहेत. 1 एप्रिल रोजी जे वयाची 18 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांनाही मतदान करता येणार आहे. 224 मतदान केंद्रावर तरुण कर्मचारी तैनात राहणार आहेत. 100 मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी तैनात राहणार आहेत. राज्यात 240 मॉडेल पोलिंग स्टेशन असणार आहेत. या ठिकाणी तरुणांना तैनात करण्यात येणार आहे. राज्यात एकूण 58 हजार 282 मतदान केंद्र आहेत. त्यात 20 हजार 866 मतदान केंद्र शहरी आहेत. त्यात 50 टक्के मतदान केंद्र म्हणजे 29 हजार 140 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होईल.

पैशाचा गैरवापर रोखणार

निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये, मतदारांना पैशाच्या बळावर आकर्षित केलं जाऊ नये म्हणून विशेष अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी एअरपोर्ट, एअरस्ट्रिप आणि हेलिकॉप्टर्सच्या लँडिंग पॉइंटवर चेकिंग अभियान राबवण्यात येणार आहे. कोणत्याही राज्यातून कर्नाटकात पैसा येऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येणार आहे.

कर्नाटकातील मोठे मुद्दे

कर्नाटकात सध्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा ठरला आहे. त्याशिवाय महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्ये आमनेसामनेही आली होती. तसेच कर्नाटकात जातीय तणावाची स्थितीही आहेच. या शिवाय भ्रष्टाचार हा इथला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरच कर्नाटकाची निवडणूक लढवली जाणार आहे.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....