मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांने तोडले तारे

बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग असल्याची मुक्ताफळे उधळणाऱ्या कर्नाटक सरकारच्या आणखी एका मंत्र्याने आणखी एक बेताल वक्तव्य केलं आहे. (karnataka deputy cm govind karjol on chatrapati shivaji maharaj)

मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांने तोडले तारे
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 4:10 PM

बेळगाव: बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग असल्याची मुक्ताफळे उधळणाऱ्या कर्नाटक सरकारच्या आणखी एका मंत्र्याने आणखी एक बेताल वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच आहेत. ते कन्नड भूमीतीलच आहेत, असा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केला आहे. कार्जोळ यांच्या या बेताल विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (karnataka deputy cm govind karjol on chatrapati shivaji maharaj)

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे तारे तोडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले होते. शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे होते, असा अजब दावा त्यांनी केला आहे.

कार्जोळ यांचा जावई शोध

कार्जोळ हे एवढ्यावरच विधान करून थांबले नाही तर आपल्याला दाव्याला पृष्टी देण्यासाठी त्यांनी आणखी एक दावा केला आहे. शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातलीच होते. पण कर्नाटकात दुष्काळ पडल्याने महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले होते, असा जावईशोधही त्यांनी लावला आहे.

शिवसेनेला सरकार पडण्याची भीती

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरूनही त्यांनी हस्यास्पद विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस अस्वस्थ आहेत. ते कधीही शिवसेनेचा पाठिंबा काढून घेऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेला काँग्रसे पाठिंबा काढून घेण्याची सतत भीती वाटत असून त्यामुळेच ते लक्ष विचलीत करणारी विधाने करत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. (karnataka deputy cm govind karjol on chatrapati shivaji maharaj)

संबंधित बातम्या:

तात्याराव लहानेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, दरेकर म्हणाले…

…तर ते कोकणात इतर कामे करत बसले असते, गुलाबराव पाटलांचा राणेंवर घणाघात

मग तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो; अजितदादांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

(karnataka deputy cm govind karjol on chatrapati shivaji maharaj)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.