Hijab Ban : कर्नाटकमधल्या हिजाब बंदीवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब, हिजाब धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही.

Hijab Ban : कर्नाटकमधल्या हिजाब बंदीवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब, हिजाब धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा
कर्नाटकमधल्या हिजाब बंदीवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब, हिजाब धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 11:05 AM

बंगळुरू: हिजाब प्रकरणावर (Karnatak Hijab) आज कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या संदर्भातील सर्व याचिकाही कर्नाटक कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे कर्नाटकमधल्या शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही शिक्कामोर्तब झालं आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावताना विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असं कोर्टाने निकाल देताना म्हटलं आहे.

शाळा आणि महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. 9 फेब्रुवारी रोजी मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, जस्टिस कृष्णा एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांच्या पीठाचं गठन करण्यात आलं होतं. शाळेच्या आत हिजाब घालण्यास परवानगी दिली पाहिजे. कारण हा त्यांच्या अस्थेचा भाग आहे, असं विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

कोर्ट नेमकं काय म्हणालं

  1. हिजाब घालणं हे इस्लाममध्ये बंधनकारक नाही, ती आवश्यक प्रथा नाही
  2. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही
  3. विद्यार्थी शालेय गणवेश घालून येण्यास नकार देऊ शकत नाही
  4. विद्यार्थ्याांनी हिजाब घालावा की घालू नये हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे.
  5. याबाबतचे आदेश जारी करण्याची शक्ती राज्य सरकारकडे आहे
  6. शालेय गणेश ही योग्य व्यवस्था आहे. त्याला संवैधानिक आधार आहे
  7. या प्रकरणावर 11 दिवस सुनावणी चालली

राज्यात प्रचंड बंदोबस्त

हिजाब बंदीबाबत आज कोर्टाचा निकाल येणार होता. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोप्पल, गडग, कलबुर्गी, दावणगेरे, हासन, शिवामोगा, बेलगाव, चिक्कबल्लापूर, बेंगळुरू आणि धारवाड येथे 144 कलम लागू करण्यात आलं होतं. शिवामोगा येथे तर आज शाळा, महाविद्यालये बंद ठेवणअयात आले होते. तसेच कोर्टाच्या आवारातही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय?

कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. राज्यातील एका शैक्षणिक संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्यात आला आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला होता. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काही प्रभावित शैक्षणिक संस्था एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, सदर व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिमोगा येथील असल्याचा दावा केला जात होता. याच ठिकाणी मोठी दगडफेक झाली होती. त्यानंतर तेथे 144 कलम लागू करण्यात आले होते.

हिजाबचा वाद काय आहे?

साधारण 23 दिवसांपूर्वी हा वाद सुरु झाला. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा, कलम 144 लागू!

देवाची आरती, देव मला पावती! वोवालूया! संकासूराबरोबर पारंपरिक नाच, शिमगोत्सवात कोकणाच्या वैभवाचे दर्शन

VIDEO: राऊतांच्या आरोपांवर आता कंबोज यांचीच कोर्टात जायची तयारी, जीतू नवलानी रॅकेट कसे चालवायचा? सीबीआय चौकशीची मागणी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.