गरीब पुजाऱ्याशी लग्न केल्यास 3 लाखाचा बॉन्ड मिळणार; कर्नाटकात ब्राह्मण मॅरेज स्किम
कर्नाटकात ब्राह्मणांच्या विकासासाठी दोन योजना प्रयोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत आहेत. (Karnataka's Brahmin marriage schemes)
बंगळुरू: कर्नाटकात ब्राह्मणांच्या विकासासाठी दोन योजना प्रयोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत आहेत. मैत्रेयी आणि अरुंधती नावाच्या या दोन योजना असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. कर्नाटकात वर्षभरापूर्वी स्टेट ब्राह्मण डेव्हल्पमेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली असून या बोर्डानेच या दोन्ही योजनांना मंजुरी दिली आहे. (Karnataka’s Brahmin marriage schemes)
पहिल्या स्किममध्ये 25 ब्राह्मण महिलांना प्रत्येकी 3-3 लाख रुपयांचा फायनान्शिअल बॉन्ड देण्याची आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलांना याचा फायदा मिळणार आहे. दुसऱ्या स्किमनुसार 550 महिलांना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जाणार आहेत. आपल्याच समुदायातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील व्यक्तिशी लग्न करणाऱ्या महिलांना हा निधी दिला जाणार आहे.
कर्नाटकात 3 टक्के ब्राह्मण
ब्राह्मण समाजातील गरीबांच्या विकासासाठी या योजना लागू करण्यात आल्या आहेत. अरुंधती स्कीममध्ये महिलांना प्रत्येकी 25 हजार रुपये आणि मैत्रेयी स्किममध्ये महिलांना 3 लाख रुपयांचा बॉन्ड दिला जाईल, असं कर्नाटक ब्राह्मण डेव्हल्पेंट बोर्डाचे चेअरमन आणि भाजप नेते एस. एस. सच्चिदानंद मूर्ती यांनी सांगितलं. कर्नाटकची लोकसंख्या 6 कोटी आहे. त्यात ब्राह्मण 3 टक्के आहेत. या योजनांसाठी 14 कोटींचा वेगळा फंड ठेवण्यात आला आहे. या योजनांमुळे गरीब ब्राह्मणांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत होईल. त्यांना स्कॉलरशीप, शुल्क, प्रशिक्षण आदींसाठी हा निधी खर्च केला जाईल. यूपीएससी सारख्या परीक्षांसारख्या परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पैसा खर्च करण्यात येणार आहे, असल्याचं मूर्ती यांनी सांगितलं. (Karnataka’s Brahmin marriage schemes)
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7:30 PM | 7 January 2021https://t.co/fvkh4MICtg#Top9 #Top9News #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
संबंधित बातम्या:
हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू
भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात
काँग्रेस भाजपमय होतेय? मुख्यमंत्री, मंत्री चक्क पक्षाच्या कामाला, वाचा सविस्तर
(Karnataka’s Brahmin marriage schemes)