AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karseva | कारसेवकांवरुन राज्यात कुरघोडीचं राजकारण! पण ‘कार सेवा’ हा शब्द आला तरी कुठून?

Karseva | राज्यात सध्या कार सेवा कोणी केली, कार सेवक म्हणून अयोध्येला कोण गेले, यावरुन कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. आपण कार सेवेत होतो, यासाठी छायाचित्र पण पुरावा म्हणून सादर करण्यात येत आहे. राजकारण बाजूला सारत, ही कार सेवा असते काय आणि हा शब्द आला तरी कुठून, हे तुम्हाला माहिती आहे काय?

Karseva | कारसेवकांवरुन राज्यात कुरघोडीचं राजकारण! पण 'कार सेवा' हा शब्द आला तरी कुठून?
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 3:48 PM

नवी दिल्ली | 21 January 2024 : सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला विराजमान होत आहे. राम मंदिरासाठी प्रदीर्घ लढा देण्यात आला आहे. 1992 नंतर देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राम मंदिर हा विषय राहिला आहे. आजही राम मंदिरावरुन राजकारण तापलेले आहेच. पुढारी, धर्मरक्षक, धार्मिक संस्थासह इतर अनेक लोक राम मंदिरावरुन राजकारण करत असल्याचे दिसून येते. राम मंदिराचे नाव येताच ‘कार सेवक’ हा शब्द आपसूकच येतो. आता राज्यात कार सेवा वरुन राजकारणाच्या कुरघोड्या सुरु आहेत. दोन्ही पक्ष पुरावे मागत आहेत आणि पुरावे पण सादर होत आहेत. तर ही कार सेवा नेमकी आहे तरी काय आणि या शब्दाचं माहेर कोणतं असा प्रश्न अनेकांना पडतो, त्याचे उत्तर जाणून घेऊयात…

कोण आहेत कार सेवक

भारताच्या इतिहासात 6 डिसेंबर 1992 ही तारीख फार महत्वाची आहे. याच दिवशी बाबरी मशिदी पाडण्यात आली होती. त्यामागे विविध कारणे आहेत. प्रदिर्घ लढाई आणि इतिहास आहे. त्यावेळी गावागावातून कार सेवेसाठी अयोध्येला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात अनेक गावातील लोक सहभागी झाले होते. मंदिराच्या आंदोलनात सहभागी झालेले हे लोक कार सेवक म्हणून ओळखल्या जातात.

हे सुद्धा वाचा

कारसेवा म्हणजे तरी काय

तर कार सेवा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. तर यातील कार हा शब्द कर म्हणजे हात अशा अर्थाने आलेला आहे. तर सेवा, सेवक या अर्थाने आहे. निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक, काही जण त्याला Volunteer असा इंग्रजीतील प्रतिशब्द वापरतात. पण काहींच्या मते, स्वयंसेवक आणि कारसेवक यामध्ये धार्मिक सेवेच्या अर्थाने मोठा फरक आहे.

कुठे उल्लेख आहे पहिला

तर शीख धर्मग्रंथात हा शब्द अनेकदा आलेला आहे. कार सेवा ही शीख धर्माचाच एक संस्कार, शिक्षण आहे. उधमसिंह यांनी जालियानवाला बाग दरम्यान कार सेवा केल्याचा उल्लेख आढळतो. स्वर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच करण्यात आली आहे. राम मंदिरासाठी अनेक तरुणांनी कार सेवा केली.

पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...