जिंकण्यासाठी एकापाठोपाठ एक झपाझप इडली खात गेला, आणि अचानक….

इडली चटणी, सांबार हा अनेकांचा आवडता नाष्टा आहे. 50 वर्षाच्या एका व्यक्तीने सुद्धा या इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. हा व्यक्ती एकापाठोपाठ एक इडली खात गेला.

जिंकण्यासाठी एकापाठोपाठ एक झपाझप इडली खात गेला, आणि अचानक....
idli eating competition
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 12:50 PM

इडली हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. अनेकजण सकाळच्या नाष्ट्याला इडलीला प्राधान्य देतात. इडली चटणी, सांबार हा अनेकांचा आवडता नाष्टा आहे. हीच इडली खाण्याची केरळमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 50 वर्षाच्या एका व्यक्तीने सुद्धा या इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. पण इडली खाण्याची ही स्पर्धा त्याच्या जीवावर बेतली. हा व्यक्ती एकापाठोपाठ एक इडली खात गेला, कारण त्याला स्पर्धा जिंकायची होती. पण अचानक एक इडली त्याच्या गळ्यामध्ये अडकली. त्यामुळे त्याला श्वासोश्वास करण्यात त्रास होऊ लागला. लगेच त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोड गावातील ही घटना आहे. यगां ओणम उत्सव साजरा होत असताना ही दुर्घटना घडली. 15 सप्टेंबरला काल संपूर्ण केरळमध्ये ओणमचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कांजीकोड गावात काही युवकांनी या सणाच्या निमित्ताने इडली खाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. अनेक युवक या स्पर्धेत सहभागी झाले होते. 50 वर्षाचे सुरेश सुद्धा या स्पर्धेत सहभागी झालेले. कमीवेळेत सर्वाधिक इडली खाणाऱ्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात येणार होतं.

इडली खायला सुरुवात

स्पर्धा सुरु होताच सर्वांनी इडली खायला सुरुवात केली. सुरेश यांनी सुद्धा एकापाठोपाठ एक इडली खायला सुरुवात केली. दुर्भाग्याने एक इडली गळ्याकडे जाऊन अडकली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ते तिथेच खाली कोसळले. तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रेफर केलं. तिथे डॉक्टरांना रुग्णाचे प्राण वाचवण्यात अपयश आलं. उपचारादरम्यान सुरेश यांचा मृत्यू झाला.

रडून-रडून वाईट अवस्था

पोलिसांना या घटनेची माहिती दिलीय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुरेश यांच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल समजताच त्यांच्या घरावर शोककळा पसरली. कुटुंबाची रडून-रडून वाईट अवस्था आहे. ओणमच्या दिवशी आनंदाऐवजी घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.