केरळच्या मुख्यमंत्र्यांनी अख्खं कॅबिनेटच बदलून टाकलं, जावयाच्या एंट्रीनं ‘डाव्यां’मध्ये घराणेशाहीचा वाद

शैलजा यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यामागे त्यांची वाढती लोकप्रियता हे मुख्य कारण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. | Kerla new cabinet

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी अख्खं कॅबिनेटच बदलून टाकलं, जावयाच्या एंट्रीनं 'डाव्यां'मध्ये घराणेशाहीचा वाद
केके शैलजा आणि पिनराई विजयन
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 12:49 PM

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लेफ्ट डेमोक्रॅटिक अलायन्सने (LDF) ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्यामुळे आता LDF पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. पिनराई विजयन (pinarayi vijayan)  यांची मंगळवारी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळात कोण असणार यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. (Kerla new cabinet controversy over removal of kk shailaja and pinarayi vijayan son in law mohammed riyaz)

सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पिनराई विजयन वगळता सर्व नवे मंत्री असतील. या निर्णयामुळे केरळच्या माजी आरोग्यमंत्री केके शैलजा उर्फ शैलजा टीचर यांना मंत्रिमंडळातून बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे केरळमध्ये सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण, शैलजा यांनी 2018 मध्ये आलेला निपाह व्हायरस आणि कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशभरात केरळची प्रचंड चर्चा सुरु होती. या मॉडेलचा मुख्य चेहरा म्हणून शैलजा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता त्यांनाच मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने अनेकांनी टीकेचा सूर आळवला आहे.

नवी टीम चांगले काम करेल: केके शैलजा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केके शैलजा यांनी मट्टनूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 60 हजार मतांनी विजय मिळवला. मात्र, त्यानंतरही शैलजा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही. यावरुन इतर डाव्या विचारसरणीच्या पक्षांतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शैलजा यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यामागे त्यांची वाढती लोकप्रियता हे मुख्य कारण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 1987 साली केरळातील नेत्या आर. गौरी यांचीही लोकप्रियता शिखरावर होती. त्यावेळी LDF ने आर. गौरी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. मात्र, निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा बाजूला सारण्यात आले होते.

दरम्यान, पिनराई विजयन यांच्या या निर्णयावर केके शैलजा नाराज नाहीत. मला मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही म्हणून भावूक होण्याचे कारण नाही. यापूर्वी पक्षाने संधी दिल्यामुळेच मी आरोग्यमंत्री होऊ शकले. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. मंत्रिमंडळाची नवी टीम चांगले काम करेल, हा विश्वास मला आहे. आपण एक व्यक्ती म्हणून नव्हे तर व्यवस्था म्हणून कोरोनाविरुद्ध लढत आहोत, असे केके शैलजा यांनी म्हटले.

डाव्यांमध्ये घराणेशाही?

या सगळ्या घडामोडींमुळे डाव्या विचारसरणीच्या पक्षालाही घराणेशाहीची बाधा झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण नव्या मंत्रिमंडळात पिनराई विजयन यांचे जावई आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियास यांचा समावेश केला जाणार आहे. मोहम्मद रियाझ आणि पिनराई विजय यांच्या मुलीचे गेल्यावर्षी लग्न झाले होते.

याशिवाय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPM) कार्यकारिणीत कार्यकारी सचिव ए विजयराघवन आणि त्यांची पत्नी आर. बिंदू या दोघांनाही स्थान देण्यात आले होते. CPM ने मंत्रिपदासाठी दोन नावांची घोषणा केली आहे. यामध्ये आर. बिंदू आणि वीणा जॉर्ज यांचा समावेश आहे. मोहम्मद रियाझ आणि आर. बिंदू हे दोघेही पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आम्हाला नव्या पिढीला संधी द्यायची असल्याने हा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून सांगितले. आता येत्या 20 तारखेला पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.