Coronavirus: मास्क घालून बोलण्यात अडचण येतेय, मग हा मास्क पाहाच
मास्क आणि फेसशिल्डमुळे आपण काय बोलतोय हे समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना बरेच कष्ट पडत होते. | Mask coronaviurs
मुंबई: कोरोनाच्या धोक्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क ही अनिवार्य गरज झाली आहे. मात्र, तोंडावर मास्क (Mask) लावून वावरताना अनेक अडथळे येतात. एकमेकांशी बोलताना संवाद साधताना बरीच अडचण होते. यावर आता केरळातील एका विद्यार्थ्याने उपाय शोधून काढला आहे. (Kerla student created special mask with mic and speaker for Corona warriors)
केरळच्या त्रिशूर सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकच्या प्रथम वर्षाला असणाऱ्या केविन जेकब याने एक मास्क तयार केला आहे. मास्क घातल्यानंतर सहजपणे संवाद साधता यावा, यासाठी त्यामध्ये माईक आणि स्पीकरची सुविधा देण्यात आली आहे.
केविनचे आई-वडील पेशाने डॉक्टर आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतेवेळी त्यांच्याशी संवाद साधण्यात त्यांना अनेक अडचणी येत असल्याचे केविनने पाहिले. मास्क आणि फेसशिल्डमुळे आपण काय बोलतोय हे समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना बरेच कष्ट पडत होते. यामुळेच मला माईक आणि स्पीकर असलेला मास्क तयार करण्याची कल्पना सुचली.
त्यानंतर केविनने एक प्रोटोटाईप मास्क तयार करुन तो आपल्या आई-वडिलांना वापरायला दिला. रुग्णालयात हा मास्क चांगलाच लोकप्रिय झाला. मागणी वाढायला लागल्यानंतर केविनने आणखी मास्क तयार करण्यास सुरुवात केली.
Kerala | Kevin Jacob, a first year B Tech student from Thrissur, has designed a mask with a mic & speaker attached to ease communication amid pandemic
“My parents are doctors & they’ve been struggling to communicate with their patients since the onset of COVID,” he said (23.05) pic.twitter.com/pnvkhzZETt
— ANI (@ANI) May 23, 2021
सहा तासांचा बॅटरी बॅकअप
मास्कवर लावण्यात आलेल्या उपकरणांना चार्ज करावे लागते. त्यानंतर चार ते सहा तासांपर्यंत हा मास्क वापरता येऊ शकतो. अनेक डॉक्टरांचे काम यामुळे सोपे झाले आहे. या मास्कमुळे आम्ही रुग्णांशी सहजपणे संवाद साधू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
आता केविन जेकब या मास्कची मोठ्याप्रमाणावर निर्मिती करण्यासाठी कंपनीच्या शोधात आहे. केविनने अशाप्रकारचे 50 मास्क तयार केले आहेत. केरळमधील अनेक डॉक्टर्स सध्या त्याचा उपयोग करत आहेत. त्यामुळे या मास्कचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन करण्यासाठी केविन प्रयत्नशील आहे.
संबंधित बातम्या:
Special Report | ….म्हणून अर्धा महाराष्ट्र मास्क घालत नाही?
Raj Thackeray | मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतो : राज ठाकरे
(Kerla student created special mask with mic and speaker for Corona warriors)