Aditya L 1 | एका छोट्याशा खेड्यातील सूनेची आदित्य एल 1 चा हार्ट बनवण्यात महत्त्वाचा रोल

Aditya L 1 | आदित्य एल 1 च्या रुपाने भारताच पहिलं सौर मिशन सुरु झालय. या मिशनच हार्ट बनवण्यात प्रिया कृष्णकांत शर्माने खूप महत्त्वाची भूमिका बजावलीय. छोट्याशा कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या या मुलीचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास अभिमानास्पद आहे.

Aditya L 1 | एका छोट्याशा खेड्यातील सूनेची आदित्य एल 1 चा हार्ट बनवण्यात महत्त्वाचा रोल
ISRO Aditya L1 Mission
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 3:39 PM

भोपाळ : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO च सोलर मिशन आदित्य L-1 शनिवारी लॉन्च झालं. आदित्य L-1 च हार्ट बनवण्यात मध्य प्रदेश बड़वाहची (खरगोन ) सून प्रियाने महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल-1 उपग्रह अवकाशात झेपावला. जवळपास 125 दिवसांचा प्रवास करुन आदित्य L-1 सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या L 1 पॉइंटवर स्थापित करण्यात येणार आहे. या उपग्रहातील वेगवेगळी उपकरण म्हणजे पेलोड सूर्याचा अभ्यास करतील. एकूण 7 पेलोड आदित्य L-1 मध्ये आहेत. विजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ (वीईएएलसी) पेलोडला मिशनच हार्ट म्हटलं जातय. हे हार्ट बनवण्यात प्रिया कृष्णकांत शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्वी चांद्रयान-3 मिशननंतर आदित्य एल 1 मोहीम सुरु झालीय.

प्रिया कृष्णकांत शर्मा सध्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स बंगळुरु येथे प्रोजेक्ट इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. हा पेलोड याच संस्थेत बनवण्यात आलाय. प्रियाने या पेलोडच्या ऑप्टिकल डिजाइन एनालिसिस आणि सिम्युलेशनमध्ये योगदान दिलय. जेव्हा हा पेलोड आदित्य एल 1 मध्ये जोडण्यात आला, त्यावेळी अंतिम ऑप्टिकल टेस्ट दरम्यान प्रिया इस्रोच्या प्रयोगशाळेत उपस्थित होत्या. मिशन लॉन्च होण्याआधी ऑप्टिकल टेस्टमध्ये प्रियाने केलेली प्लानिग आणि सिम्युलेशन रिजल्टमधून संपूर्ण टीमला निष्कर्ष काढण्यात मदत मिळाली. या मिशनमुळे प्रिया भरपूर उत्साहित आहे. आदित्य L-1 उपग्रह L-1 पॉइंटवर स्थापित केल्यानंतर VELC पेलोडवरुन जो डाटा येईल, त्याच्या एनालिसिस टीममध्ये प्रिया आहे.

प्रियाच शिक्षण निश्चित अभिमानास्पद

प्रियाने खरगोनच्या मंडलेश्वर येथील एका प्रायव्हेट कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे. त्यानंतर इंदोर SGSITS ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्समध्ये M. Tech केलं. प्रियाने IIT इंदोरमध्ये जवळपास 6 महिने कार्य केलं. त्यानंतर DRDO मध्ये तिची निवड झाली. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2022 दरम्यान DRDO मध्ये राहून सुरक्षेशी संबंधित विभिन्न विभागात काम केलं. DRDO मधील रिसर्चच्या आधारावर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स बंगळुरुमध्ये तिचं सिलेक्शन झालं. याच ठिकाणी प्रिया पेलोडच्या फायनल टेस्टिंग दरम्यान टीमचा भाग बनली. प्रियाचे आई-वडिल, भाऊ काय करतात?

प्रिया शर्माच माहेर देवी अहिल्या नगरच्या खरगोन जिल्ह्यातील महेश्वरमध्ये आहे. प्रियाचे वडिल श्याम गावशिंदे आणि आई गायत्री गावशिंदे दोघे शिक्षक आहेत. तिचा भाऊ गौरव न्यायालयीन कर्मचारी आहे. तिचं प्रारंभिक शिक्षण तिथेच झालय. सध्या प्रिया बंगळुरुत नवरा कृष्णकांत शर्मा यांच्यासोबत राहते. कृष्णकांत ऑटोमेशन इंजिनिअर आहेत. बंगळुरुत एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.