अनेक कंपन्या आणि हॉटेलची मालकी; रॉबर्ट वाड्रांची संपत्ती ऐकाल तर चक्रावून जाल!

| Updated on: Jan 05, 2021 | 5:37 PM

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने चौकशी केली आहे. (Know About Robert Vadra Net Worth, Income And Property)

अनेक कंपन्या आणि हॉटेलची मालकी; रॉबर्ट वाड्रांची संपत्ती ऐकाल तर चक्रावून जाल!
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने चौकशी केली आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी ही चौकशी करण्यात येत आहे. पण अनेक कंपन्या आणि हॉटेलचे मालक असलेल्या वाड्रा यांची संपत्ती ऐकाल तर तुम्हीही चक्रावून जाल. वाड्रा यांच्याकडे तब्बल 15 हजार कोटींची संपत्ती असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Know About Robert Vadra Net Worth, Income And Property)

बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या संपत्तीचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘सेलिब्रिटी नेटवर्थ डॉट कॉम’ या संकेतस्थळानं रॉबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीचा आकडा जाहीर केला आहे. या संकेतस्थळाच्या दाव्यानुसार वाड्रा यांची संपत्ती 2.1 बिलियन डॉलर (1,53,77,19,75,000 रुपए) एवढी आहे. वाड्रा हे देशातील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात ज्वेलरी एक्सपोर्ट, रिअल इस्टेट, हॉटेल आणि एअरक्राफ्ट सारख्या व्यवसायांचा समावेश आहे. रिअल इस्टेट सेक्टरमधील भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या डीएलएफमध्येही वाड्रा यांची भागीदारी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

हॉटेल व्यवसायाचं जाळं

वाड्रा यांचे देशातील अनेक भागात हॉटेल व्यवसायाचं जाळं आहे. दिल्लीसह काही महत्त्वाच्या शहरात त्यांच्या हॉटेल व्यवसायाची चेन आहे. त्याशिवाय आर्टेक्स या ज्वेलरी निर्यात करणाऱ्या कंपनीतही त्यांची भागिदारी आहे. सेलिब्रिटी नेटवर्थच्या दाव्यानुसार वाड्रा यांनी एअरक्राप्टच्या व्यवसायाचाही अनुभव घेतलेला आहे.

या व्यवसायातही…

रिअल इस्टेट, ज्वेलरी एक्सपोर्ट, हॉटेल, एव्हिएशनसह स्काई लाईट हॉस्पिटॅलिटीचेही वाड्रा हे मालक आहेत. या कंपनीत त्यांची आईही त्यांची पार्टनर आहे. रिअल इस्टेटमध्ये डीएलएफशिवाय त्यांच्याकडे यूनिटेकचीही 20 टक्के भागिदारी आहे. विशेष म्हणजे देशातील बहुचर्चित टू-जी स्कॅम घोटाळ्यात यूनिटेकचं नाव आलेलं आहे.

आयकर, ईडीचे छापे का?

गेल्या काही दिवसांपासून वाड्रा यांच्या मागे ईडी आणि आयकर विभागाचे शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यांची मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी चौकशीही सुरू आहे. वाड्रा यांनी लंडनमध्ये 12, ब्रायन्स्टन स्क्वॉयर प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यात त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. मात्र, वाड्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. (Know About Robert Vadra Net Worth, Income And Property)

 

संबंधित बातम्या:

रॉबर्ट वाड्रांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाची धडक; बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू

 कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि शेतजमीन खरेदीबाबत रिलायन्सचं स्पष्टीकरण

भाजपच्या ‘सायलेंट वोटर्स’वर काँग्रेसचं लक्ष, 5 राज्यांसाठी नवी रणनिती काय?

(Know About Robert Vadra Net Worth, Income And Property)