ट्विटरचे CEO म्हणून ज्यांची जगभर चर्चा, त्या पराग अग्रवाल यांचा नेमका पगार किती? कुठे कुठे काम केलंय?
जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ट्विटरच्या (Twitter) सीईओ पदाची धुरा मराठमोळ्या पराग अग्रवाल (Parag Agarwal)यांच्या हाती आली आहे. ते यापूर्वी कंपनीमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदावर कार्यरत होते.
नवी दिल्ली : जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ट्विटरच्या (Twitter) सीईओ पदाची धुरा मराठमोळ्या पराग अग्रवाल (Parag Agarwal)यांच्या हाती आली आहे. ते यापूर्वी कंपनीमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदावर कार्यरत होते. अग्रवाल यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ट्विटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनवण्यात आले. कंपनीचे माजी सीईओ जॅक डॉर्सी हे पहिल्यापासून अग्रवाल यांच्या कामामुळे प्रभावित होते. त्यामुळे त्यांना आता सीईओपदाची जबाबदारी मिळाली.
सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात
भारतामध्ये जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी यापूर्वी मायक्रोसॉफ्ट (Microsoft)आणि याहू ( yahoo)मध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली होती. कंपनीना टेक्निकली स्ट्रॉंग बनवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. 2017 मध्ये त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनवण्यात आले आणि आता त्यांच्या खांद्यावर कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनताच ते समाज माध्यंमावर ट्रेंड झाले. अनेकांना त्यांना ट्विटर आता किती वेतन देणार याबाबतची उत्सुकता असल्याचे पहायला मिळाली.
साडेसात कोटी रुपयांचे वेतन
सोमवारी समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना कंपनीकडून तब्बल एक मिलियन डॉलर म्हणजेच साडेसात कोटी रुपये वेतन मिळणार आहे. दरम्यान त्यांच्या वेतनाबाबत वेगवेगळ्या वृत्तपत्राकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहेत. एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार ट्विटरने त्यांना 1.52 मिलीयन डॉलर इतके वेतने दिले आहे. दरम्यान ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत. जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरच जॅक यांचे आभार मानतो असे पराग यांनी म्हटले आहे.
11.41 कोटींच्या संपत्तीचे मालक
पराग अग्रवाल हे Twitter च्या Bluesky चे नेतृत्व करत होते, ज्याचे उद्दिष्ट सोशल मीडियासाठी खुले आणि विकेंद्रित (Open and Decentralised Standard) मानक तयार करणे होते. CTO या नात्याने, पराग यांच्यावर ट्विटरच्या तंत्रज्ञान रणनीती आणि ग्राहक महसूल आणि विज्ञान संघांमध्ये मशीन लर्निंग आणि AI ची देखरेख या जबाबदाऱ्या होत्या. अग्रवाल यांची एकूण संपत्ती अंदाजे 1.52 मिलिअन डॉलर म्हणजेच 11 कोटी 41 लाख 91 हजार 596 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या
इथे वाघ दत्तक घेणे आहे! औरंगाबाद महापालिकेची योजना, एक वर्षाच्या देखभालीचा खर्च पालकांनी घ्यावा!