भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती

कोरोना विरोधी लसीकरणावरुन देशाच्या सर्वोच्च न्यायालयापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील लसीकरणाची अद्ययावत माहिती जाहीर केलीय.

भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती
corona vaccination
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 4:20 AM

नवी दिल्ली : कोरोना विरोधी लसीकरणावरुन देशाच्या सर्वोच्च न्यायालयापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील लसीकरणाची अद्ययावत माहिती जाहीर केलीय. यात आतापर्यंत कोणत्या वयोगटात किती लसीकरण झालंय आणि देशातील कोरोना संसर्गाचा प्रमाण काय आहे याची माहिती देण्यात आलीय. तसेच संसर्गजन्य आजाराच्या नव्या लाटा का येतात याचंही विश्लेषण करण्यात आलंय (Know all about Total Corona Vaccination infection statistics of India).

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “भारतात आतापर्यंत 23.62 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 18-44 वयोगटातील 3.04 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आतापर्यंत 45 वर्षांवरील 13.29 कोटी व्यक्तींना लसीची पहिला डोस देण्यात आला. देशात जास्त रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या जिल्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान ही संख्या 531 वरून 209 झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन 100 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे.”

भारतात सर्वात कमी प्रति दशलक्ष लोकसंख्येतील उपचाराधीन रुग्ण

“उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होऊन ही संख्या आता 13.03 लाख झाली आहे. गुजरातमध्ये लोकसंख्येची घनता युकेच्या 1.3 पट आहे. मात्र गुजरातमध्ये युकेच्या तुलनेत 5.5 पट कमी रुग्णांची नोंद झाली आहे. युकेच्या तुलनेत गुजरातमध्ये प्रतिदशलक्ष लोकसंख्येत एकूण रुग्ण आणि प्रतिदशलक्ष लोकसंख्येत दैनंदिन सर्वोच्च रुग्णसंख्या देखील कमी आहे. भारतात, प्रति दशलक्ष लोकसंख्येतील रुग्णसंख्या जगातील सर्वात कमी रुग्णसंख्यांपैकी एक आहे. प्रति दशलक्ष लोकसंख्येतील उपचाराधीन रुग्णांची संख्या जगातील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी एक आहे,” अशीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

महामारीमध्ये लाटा का येतात?

संसर्गजन्य साथीरोगाच्या लाटा का येतात यावर बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले, “जेव्हा विषाणू स्वतःमध्ये बदल करून घेतो, तेव्हा नव्याने तयार झालेला प्रकार अधिक संसर्गजन्य असू शकतो. जेव्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागते आणि निर्बंध शिथिल होतात तेव्हा लोक COVID प्रतिबंधक नियमांचे पालन थांबवू लागतात. अशाप्रकारे मानवी वर्तनातूनही नवी लाट येते.”

हेही वाचा :

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला जाग, बाळासाहेब थोरातांचा जोरदार टोला

Corona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखेर मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द

नवी मुंबईत विशेष कोव्हिड लसीकरण सत्र, दिव्यांग, निराधार, व्याधीग्रस्त महिलांसाठी खास सुविधा

व्हिडीओ पाहा :

Know all about Total Corona Vaccination infection statistics of India

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.