Rajya Sabha Election : ज्या इम्रान प्रतापगढीवरुन आशिष देशमुख, नगमा नाराज, नेमकी त्यांना लॉटरी कशी लागली? मुकूल वासनिकही हैराण, वाचा इनसाईड स्टोरी

Rajya Sabha Election : मुकूल वासनिक हे काँग्रेसचे महासचिव आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारीही आहेत. त्यांना काँग्रेसने मुकूल वासनिक यांना राजस्थानमधून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. ते महाराष्ट्रातील असून त्यांना राजस्थानातून तिकीट दिलं आहे.

Rajya Sabha Election : ज्या इम्रान प्रतापगढीवरुन आशिष देशमुख, नगमा नाराज, नेमकी त्यांना लॉटरी कशी लागली? मुकूल वासनिकही हैराण, वाचा इनसाईड स्टोरी
ज्या इम्रान प्रतापगढीवरुन आशिष देशमुख, नगमा नाराज, नेमकी त्यांना लॉटरी कशी लागली? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 4:57 PM

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात लोकसभा (uttar pradesh) निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही इमरान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांना काँग्रेसने (congress) राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेलं असतानाही प्रतापगढी यांना तिकीट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. खुद्द काँग्रेस नेत्या नगमा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तीन चार वर्षात पक्षात आलेल्यांनी तिकीट मिळते, आम्ही 18 वर्षापासून पक्षात काम करत आहोत, आम्हाला तिकीट का मिळत नाही? असा सवाल नगमा यांनी व्यक्त केला आहे. तर आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या महासचिवपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. प्रतापगढींना तिकीट मिळाल्याने ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक हे सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे प्रतापगढींना तिकीट मिळालं. याचाच घेतलेला हा आढावा.

मुकूल वासनिक हे काँग्रेसचे महासचिव आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारीही आहेत. त्यांना काँग्रेसने मुकूल वासनिक यांना राजस्थानमधून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. ते महाराष्ट्रातील असून त्यांना राजस्थानातून तिकीट दिलं आहे. तर इमरान प्रतापगढी उत्तर प्रदेशातून असूनही त्यांनी महाराष्ट्रातून तिकीट दिलं आहे. प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून तिकीट दिल्याचे वासनिक यांना माहीत नव्हतं. जेव्हा काँग्रेस उमेदवारांची बातमी वाचली तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. वासनिक त्यांच्या खोलीत पोहोचले. तेव्हा केरळातील त्यांचे सहकारी नारायण दास हसत होते. त्यांच्याकडे पाहिले न् पाहिले असं दाखवत वासनिक यांनी पेन हातात घेतला. त्यांनी लिस्टमध्ये आपलं नाव पाहिलं. लिस्टमध्ये त्यांचं नाव आठव्या क्रमांकावर होतं.

हे सुद्धा वाचा

झूम कॉलने भाग्य बदललं

काँग्रेसच्या या यादीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लंडनमधून आलेल्या एका झूम कॉलने अनेकांचं भाग्य बदलल्याचं सांगितलं जातं. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीयांना या यादीत स्थान मिळालं हा एक योगायोग असल्याचं सांगितलं जातं. मात्र, प्रतापगढी हे गांधी कुटुंबाच्या इतक्या जवळचे नाहीत. तरीही या यादीत त्यांचं नाव आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्त्वाचा सवाल

ही यादी पाहिल्यानंतर दोन प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेसची सूत्रे खरोखरच गांधी कुटुंबाच्याच हातात आहेत का? याचं उत्तर होय असं असेल तर मग रणदीप सुरजेवाला यांना त्यांची जन्मभूमी असलेल्या हरियाणातून तिकीट का दिलं नाही? त्यांना राज्यसभेतून उमेदवारी देण्याचं कारण काय? असा सवाल केला जात आहे. हरियाणात हुड्डा यांचं प्राबल्य आहे. त्यामुळेच सुरजेवाला यांना राजस्थानात जावं लागल्याचं सांगितलं जातं. जे सुरजेवाला यांच्याबाबत झालं, तेच प्रतापगढी यांच्याबाबत झालं आहे.

म्हणून प्रतापगढींना महाराष्ट्रातून पाठवलं

प्रतापगढींना महाराष्ट्राऐवजी इतर राज्यातून राज्यसभेत पाठवलं जाऊ शकलं असतं. महाराष्ट्राचा क्रॉस व्होटिंगचा इतिहास आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतरही त्यांच्या निकटवर्तीयांना राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळेच हा दगा फटका त्याच राज्यातील उमेदवाराला होऊ नये म्हणून काँग्रेसने प्रतापगढींना महाराष्ट्रातून आणि वासनिक यांना राजस्थानमधून मैदानात उतरवले आहे. तर या यादीतील 50 टक्के नेत्यांना त्यांच्याच राज्यातून उमेदवारीही देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.