Know This : वडनगर ते गांधीनगर आणि नवी दिल्ली, चहावाला ते पंतप्रधान, मोदींचा भन्नाट प्रवास

Modi Birthday: एक राजकारणी जे गेल्या 20 वर्षांपासून जनहितासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे, आधी मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयात दिसून येते. मोदी एक पंतप्रधान आहेत, ज्यांनी देशाची स्थिती आणि दिशा बदलण्याचे काम केले.

Know This : वडनगर ते गांधीनगर आणि नवी दिल्ली, चहावाला ते पंतप्रधान, मोदींचा भन्नाट प्रवास
PM Modi
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 4:25 PM

नरेंद्र दामोदरदास मोदी – भारताचे 14 वे पंतप्रधान आणि सध्या जगातील सर्वात लोकप्रिय नेते. करोडो देशवासियांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या भारतीय राजकारणाचा चेहरा. जे देशाच्या हितासाठी जोखीम घ्यायला घाबरत नाही, जे प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतो. नरेंद्र मोदी, एक राजकारणी जे गेल्या 20 वर्षांपासून जनहितासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे, आधी मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयात दिसून येते. मोदी एक पंतप्रधान आहेत, ज्यांनी देशाची स्थिती आणि दिशा बदलण्याचे काम केले.

नरेंद्र मोदींचं बालपण

नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. तिथल्याच भगवाचार्य नारायणचार्य शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील तिथल्याच रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. अभ्यासाबरोबरच नरेंद्र मोदी वडिलांना चहाच्या दुकानात मदत करायचे. वयाच्या 18 व्या वर्षापासून नरेंद्र मोदींचा कल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे वळला आणि ते संघाच्या शाखांमध्ये जाऊ लागले. यानंतर, वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी 1967 मध्ये नरेंद्र मोदींनी अहमदाबाद गाठलं आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले.

आणि मोदी चळवळीत आले आणि प्रचारक झाले

1974 साली ते नवनिर्माण चळवळीतही सामील होते. यानंतर, 1975 साली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींना गुजरात लोक संघ समितीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती दिली. त्याच वर्षी, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली, तेव्हा मोदींनी वेश बदलून संघ प्रचारकांना मदत करणं सुरु ठेवलं. 1978 मध्ये मोदी संघाचे प्रचारक बनले. सुरत आणि वडोदरा येथे संघाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेऊ लागले. त्याच वर्षी नरेंद्र मोदींनी दिल्ली विद्यापीठातून बीए पूर्ण केलं. 1983 मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमएची पदवी घेतली.

संघमार्गे मोदींचा भाजपमध्ये प्रवेश

यानंतर, 1985 साली नरेंद्र मोदी गुजरातच्या भाजप युनिटमध्ये सामील झाले आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले. 1987 मध्ये मोदींनी अहमदाबाद नगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी प्रचार केला आणि त्यांच्या प्रभावी प्रचारामुळेच भाजपने या निवडणुका जिंकल्या 1988-89 मध्ये नरेंद्र मोदींना भाजपच्या गुजरात युनिटचं सरचिटणीस बनवण्यात आलं. 1990 मध्ये मोदींनी लालकृष्ण अडवाणींच्या सोमनाथ-अयोध्या रथ यात्रेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना अनेक राज्यांचे प्रभारी बनवण्यात आले. 1995 मध्ये पक्षाने त्यांना अधिक जबाबदारी दिली आणि त्यांना भाजप राष्ट्रीय सचिव आणि पाच राज्यांमध्ये पक्ष प्रभारी बनवलं. यानंतर 1998 साली त्यांना संघटनेचं सरचिटणीस पद देण्यात आलं. नरेंद्र मोदी 2001 पर्यंत या पदावर राहिले.

भूकंपाने केशुभाई पटेलांची खुर्ची गेली, मोदी मुख्यमंत्री झाले

2001, जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला, तिथं मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, 20 हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. त्यानंतर भाजपने केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकलं आणि गुजरातची नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवलं. ऑक्टोबर 2001 मध्ये मोदींनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मोदींनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. डिसेंबर 2002 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विजयी झाले. 2007 मध्ये नरेंद्र मोदींनी धर्माला फाटा देत विकासाला मुख्य मुद्दा बनवला आणि ते जिंकले. निवडणुक जिंकल्यानंतर त्यांना सर्वसमावेशी नेता म्हणून मान्यता मिळाली. 2012 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या. सलग 4 वेळा मुख्यमंत्री बनलेल्या मोदींचं नाणं आता केंद्रीय राजकारणातही चालणार होतं.

गुजरातच्या विकासाचा चेहरा, देशाच्या पंतप्रधानपदाचा चेहरा बनले

2013 मध्ये नरेंद्र मोदी 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले गेले. विकासाचा नारा देत नरेंद्र मोदींनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला आणि 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, भाजप 3 दशकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळवणारा पहिला पक्ष ठरला. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला.पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांनी केवळ देशातीलच नव्हे तर जगभरात भारताची प्रतिमा बदलण्याचं काम केलं. मोदींचा प्रत्येक निर्णय त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दाखवतो. ‘अच्छे दिन’ च्या घोषवाक्यापासून ते ‘स्वावलंबी भारत’ पर्यंत, ‘मोदी स्टाईल’ ही पंतप्रधानांच्या प्रत्येक योजनेत स्पष्टपणे दिसून येते.

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचं काम

हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या भारताच्या योग परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्याचे श्रेय हे नरेंद्र मोदी यांनाच जातं. 2014 पासून मोदींच्या प्रयत्नांमुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून रोजी जगभरात साजरा केला जाऊ लागला. उरी आणि पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानात घुसून त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅडवर सर्जिकल स्ट्राईक केला. काळा पैसा आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी नोटाबंदीसारखा ऐतिहासिक निर्णय यावर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला. पीएम मोदींचा प्रत्येक परदेश दौरा हा चर्चेचा विषय असला, तरी त्यांच्या अनेक देशांच्या दौऱ्यांनी नवे विक्रम निर्माण केले. इस्राईल आणि पॅलेस्टाईन सारख्या देशांना भेट देणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान बनले. पंतप्रधान मोदींनी मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या काळ्या प्रथेपासून मुक्त केलं. मोदींनी त्यांच्या कार्यकाळात अशा योजना सुरू केल्या, ज्यामुळे शेवटच्या रांगेत बसलेल्या गरीब लोकांचे आयुष्य बदलू लागलं. मग ती जन धन योजना आणि उज्ज्वला योजना असो, किंवा आवास योजना आणि आयुष्मान भारत सारख्या योजना असो.

दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, आणि असं केलं जे आधी कुणी केलं नव्हतं

मोदी सरकारचे काम आणि मोठे निर्णय लोकांमध्ये इतके खोलवर पोहोचले की, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 2014 पेक्षा भाजपला मोठा विजय मिळाला. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर काहीच दिवसांत नरेंद्र मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केलं. मग दुसऱ्या टर्मच्या 7 महिन्यांच्या आत, मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला. वर्षानुवर्षे न्यायालयीन कारवाईत गुंतलेल्या राम मंदिराला सर्वोच्च न्यायालयातून केवळ मोदी सरकारमध्येच न्याय मिळाला. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे अयोध्येतील रामजन्मभूमीला अधिकृतपणे प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानाचा दर्जा मिळाला. 2020 मध्ये, जेव्हा कोरोनाने जगाला वेठीस धरले आणि लोकांचं आयुष्य चार भिंतींमध्ये कैद झालं, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला वारंवार आश्वासन दिलं की, सरकार या संकटकाळात त्यांच्या पाठीशी आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून सतत 20 वर्षे पूर्ण करतील. ते पहिले भारतीय राजकारणी असतील ज्यांनी ब्रेक न घेता इतके दिवस देशाची सक्रियपणे सेवा केली आहे.

संबंधित लेख:

‘बॅकरुम बॉय’ ते ‘मोदी मीन्स बिजनेस’ ते ‘राजकारणाचा जादूगार’, नरेंद्र मोदींचा भन्नाट प्रवास

PM Modi Untold Stories : लहानपणी मगरीचं पिल्लू पकडून घरी आणलं, नरेंद्र मोदींचे 10 भन्नाट किस्से

 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.