Makar Sankranti | मकर संक्रांतच्या दिवशी खिचडी का खातात, कोणी केली या परंपरेची सुरुवात?, जाणून घ्या
या दिवशी खिचडी का खाल्ली जाते, याची अनेक आरोग्यदायी कारणं आहेत.

मुंबई : मकर संक्रांतच्या दिवशी खिचडी दान करण्याला आणि खाण्याचं महत्त्व आहे (Tradition Of Eating Khichadi). त्यामुळे हा सण अनेक ठिकाणी खिचडी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी खिचडी का खाल्ली जाते, याची अनेक आरोग्यदायी कारणं आहेत. पण, या परंपरेच्या इतिहासाबाबत क्वचितच लोकांना माहिती असेल. चला तर या खिचडीमागील कहाणी नेमकी काय आहे आणि ही परंपरा कशी सुरु झाली हे जाणून घेऊ (Tradition Of Eating Khichadi)…
याबाबत गुरु गोरखनाथ यांनी एक कहाणी खूप प्रचलित आहे. जेव्हा खिलजीने देशावर आक्रमण केलं तेव्हा चारही बाजूने संघर्ष सुरु होता. अशात ऋषी-मुनींना आपली जमीन वाचवण्यासाठी मोठा सघर्ष करावा लागत होता. अनेकदा त्यांना उपाशी राहावं लागत होतं. तेव्हा एके दिवशी बाबा गोरखनाथ यांनी ही समस्या सोडवण्यासाठी उडद डाळीत तांदूळ, तूप आणि काही भाज्या एकत्र कतरुन शिजवलं. जेणेकरुन ऋषी-मुनींचं पोट भरेल आणि हे तयार करायला जास्त वेळ घालवावा लागू नये.
जेव्हा हा पदार्थ शिजून तयार झाला तेव्हा तो सर्वांना खूप आवडला. यामुळे ऋषी-मुनींची भूक भागवण्याचा मार्गही सापडला. या पदार्थाला बाबा गोरखनाथ यांनी खिचडी हे नाव दिलं. ज्या दिवशी हा पदार्थ पहिल्यांदा तयार करण्यात आला त्यादिवशी मकर संक्रांत होती.
त्यानंतर हे ऋषी-मुनी खिलजीच्या दहशतीला दूर करण्यासही सक्षम झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी मकर संक्रांतला खिचडी बनवण्याची परंपरा सुरु झाली. गोरखपूर येथे मकर संक्रांतला विजय दर्शन पर्व म्हणूनही साजरं केलं जातं.
मकर संक्रांतचा शुभ मुहूर्त
यावर्षी मकर संक्रांतला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करु शकता. तसेतर नेहमी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.
मकर संक्रात पूजाविधी
मकर संक्रातच्या दिवशी अंघोळ करुन सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला पूजा करतात. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरतात. हे सुगडं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता (Tradition Of Eating Khichadi).
तीळ-गुळाचे महत्त्व काय?
संक्रांतिला तीळाचे फार महत्त्व आहे. मकर संक्रांतला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरुन त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने तीळ आणि गुळाने शरिराला उब मिळते. म्हणून या दिवशी तीळगुळ खाल्लं जातं.
Special Story | मकर संक्रांत, तीळगुळाचं महत्त्व, दक्षिणायन-उत्तरायण म्हणजे नेमकं काय?https://t.co/bINWsXAtAW#MakarSankranti #MakarSankranti2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2021
Tradition Of Eating Khichadi
संबंधित बातम्या :