Snake Bite : सर्प दंशात मृत्यू, मग सरणावरच युवकाच्या मृतदेहासोबत जिवंत सापाला जाळलं, कारण….

Snake Bite : एक विचित्र प्रकरण समोर आलय. एका युवकाचा सर्प दंशात मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी सापाला पकडलं. त्या सापला सरणावर मृतदेहाच्या शेजारी ठेवून जाळण्यात आलं. असं का केलं? त्याचं विचित्र कारण गावकऱ्यांनी दिलं आहे.

Snake Bite :  सर्प दंशात मृत्यू, मग सरणावरच युवकाच्या मृतदेहासोबत जिवंत सापाला जाळलं, कारण....
Representative Image
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 11:15 AM

एका 22 वर्षाच्या युवकाचा सर्प दंशात मृत्यू झाला. जो साप युवकाच्या मृत्यूला कारण ठरला, गावकऱ्यांनी त्याला पकडलं. त्यानंतर अंत्यसंस्कारावेळी सरणावर युवकाच्या मृतदेहाच्या शेजारी त्या सापाला ठेवलं व चितेला अग्नी दिला. हे प्रकरण संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरलं आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. कोरबा बैगामार गावातील ही घटना आहे. रविवारी साप चावल्याने डिगेश्वर राठियाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी डिगेश्वराच्या मृतदेहाशेजारी सापाला ठेवून त्याला सुद्धा जाळलं.

शनिवारी रात्री डिगेश्वर त्याच्या खोलीत झोपण्यासाठी बिछाना टाकत होता. त्याचवेळी लक्ष नसताना सापाने त्याला दंश केला. डिगेश्वरने आरडा-ओरडा सुरु केला. लगचेच कुटुंबीय त्याला कोरबाच्या मेडीकल कॉलेज रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचारादरम्यान रविवारी डिगेश्वरचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाकडे सोपवण्यात आला. सर्प दंशानंतर ग्रामस्थांनी सापाला पकडल व त्याला एका टोपलीत ठेवलं.

गावकऱ्यांनी असं का केलं?

डिगेश्वरच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांच्या मनात राग होता. त्यांनी सापाला पकडून ठेवलं. डिगेश्वरची अंत्ययात्रा त्याच्या घरापासून स्मशानभूमीकडे निघाली. त्यावेळी ग्रामस्थ सापाला सुद्धा तिथे घेऊन गेले. त्यांनी सापला डिगेश्वरच्या सरणावरच जिवंत जाळलं. हा विषारी साप आणखी कोणाला तरी चावले ही भिती होती. म्हणून त्यांनी सापाला जिवंत जाळलं.

गावकऱ्यांवर कारवाई होणार का?

कोरबाचे अनुविभागीय अधिकारी (वन) आशीष खेलवार यांनी सापाला मारणाऱ्या गावकऱ्यांविरुद्ध कारवाई करणार नसल्याच म्हटलं आहे. साप आणि सर्पदंशाबाबत गावकऱ्यांना शिक्षित आणि जागरुक करण्याची गरज आहे, असं खेलवार म्हणाले.

जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान.
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.