63200 कोटींचा मालक… वयाच्या 91 व्या वर्षी प्रेम जडलं; DLFच्या केपी सिंग यांची हटके लव्ह स्टोरी; पण ती कोण?
मला नवीन जीवनसाथी मिळाली हे माझं भाग्य आहे. तिचं नाव शीना आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या लोकांपैकी ती एक आहे. शीना प्रत्येक पावलावर मला साथ देत आहे. ती ऊर्जावान आहे.
नवी दिल्ली : प्रेम ही अतिशय नाजूक गोष्ट आहे. कुणाला कोणत्या वयात प्रेमरोग होईल, कुणावर जीव जडेल सांगता येतनाही. आता हेच पाहा ना, डीएलएफ एमेरिटस ग्रुपचे चेअरमन केपी सिंह यांना वयाच्या 91 व्या वर्षी प्रेम जडलं. एकाकी जीवन जगत असतानाच शीना नावाच्या महिलेवर त्यांचा जीव जडला. स्वत: सिंग यांनीच हा खुलासा केला आहे. माझ्या पत्नीचा वयाच्या 65व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 91व्या वर्षी मी प्रेमात पडलो, असं केपी सिंह यांनी म्हटलं आहे.
माझं वैवाहिक जीवन अत्यंत चांगलं चाललं होतं. माझी पत्नी केवळ माझी जीवनसाथी नव्हती तर माझी मैत्रीण होती. माझ्या पत्नीला वाचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. पण काहीच झालं नाही. निधनाच्या सहा महिन्यापूर्वी माझ्या पत्नीने माझ्याकडून वचन घेतलं होतं. हार मानायची नाही, असं वचन तिने माझ्याकडून घेतलं होतं, असं केपी सिंह यांनी सांगितलं.
एकाकीपण आलं
माझ्या पत्नीच्या निधनानंतर जीवनात रिक्तता आली होती. एखाद्या व्यक्तीसोबत वर्षानुवर्ष राहिल्यानंतर ती व्यक्ती अचानक आयुष्यातून गेल्यावर जे दु:ख होतं. ते तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. त्या एकाकीपणामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, असं ते म्हणाले.
शीना सर्वात बेस्ट
मला नवीन जीवनसाथी मिळाली हे माझं भाग्य आहे. तिचं नाव शीना आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या लोकांपैकी ती एक आहे. शीना प्रत्येक पावलावर मला साथ देत आहे. ती ऊर्जावान आहे. मला सातत्याने प्रेरणा देत असते. आता ती माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे, असं त्यांनी सांगितलं.
कॅन्सरमुळे पत्नीचा मृत्यू
केपी सिंह यांच्या पत्नी इंदिरा यांचं 2018मध्ये निधन झालं होतं. कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ते कंपनीच्या मॅनेजमेंटपदावरून दोन पावलं मागे गेले होते. ते सुमारे पाच दशके आपल्या कंपनीचे चेअरमन होते. त्यानंतर त्यांनी 2020मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.
एवढ्या संपत्तीचे मालक
केपी सिंह यांचा रिअल इस्टेटमधील अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये केपी सिंह 299व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण मिळकत 7.63 बिलियन म्हणजे सुमारे 63200 कोटी आहे. आहे.