ना भटजी, ना नवरा.. अखेरीस गुजरातच्या क्षमाचं स्वताशीच लग्न आटोपलं, वाढत्या विरोधामुळे तीन दिवसांआधीच उभी राहिली बोहल्यावर..आता हनिमूनची उत्सुकता..
क्षमा एका खाजगी कंपनीत काम करते. ती म्हणाली की, काही लोक हे अप्रासंगिक मानतील, परंतु तिला हे दाखवायचे होते की महिला महत्त्वाच्या आहेत. त्याचे पालक खुल्या मनाचे आहेत. त्यांनी या लग्नासाठी आशीर्वाद दिला. तर लग्नानंतर दोन आठवड्यांसाठी हनिमूनला गोव्याला जाणार आहे.
Sologamy : आपल्याकडे लग्न म्हटलं की बँन्ड बाजा बरात आणि बरचं काही असतं. नवरा-नवरी (bridegroom -The bride) शिवाय लग्न ही कल्पनाच केली जात नाही. पण आपल्या भारतात असं झालं आहे. जेथे मुलगी मुलग्या शिवाय बोहल्यावर चढली आहे. आणि तिने स्वतःशी लग्न केल आहे. ही काही कथा नाही तर सत्य घटना आहे. गुजरातमधील (Gujarat) एक मुलगी ही Sologamy म्हणजे स्वतःशीच लग्न करण्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. तर तिला सोशल मिडीयात अनेकांनी ट्रोल करण्याचा प्रय्तन केला होता. मात्र कोणताही दबाव न घेता तिने आपला हा अनोखा विवाह पार पाडणार असे म्हटलं होतं. तिचे लग्न 11 जूनला होणार आहे. मात्र याच्या आधीच आता तिने आपल्याचा लग्नाचा बार उडवून दिला आहे. या मुलीचं नाव आहे क्षमा बिंदू (Kshama Bindu), जिने आज स्वत:शीच लग्न केलं आहे.
लग्न म्हणजे देन आत्म्यांचं मिलन असंच काहीस आपल्याकडे म्हटलं जात. पण क्षमा म्हणते प्रेम म्हणजे स्वत:शीच असणारा लगाव. त्यामुळे मी स्वतःशी लग्न करणार. यावेळी तिने स्वत:लाच सिंदूर लावून नववधू बनवले आणि जोडीदाराऐवजी स्वतःलाच काही वचने दिली. यानंतर ती म्हणाली, “मी शेवटी एक विवाहित स्त्री बनले, याचा मला खूप आनंद झाला आहे.” 11 जूनला क्षामाचे लग्न होणार होते, पण त्या दिवशी काही वाद होण्याची शक्यता असल्याने तिने ही तारिख सोडण्याचा निर्णय घेतला. आणि 8 जूनलाच स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले.
भारतातील पहिलीच घटना
यावेळी लग्नाला क्षमाचे काही मित्र आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. विधी 40 मिनिटे चालला, जो भडजी नसल्याने डिजिटल पद्धतीने पूर्ण झाला. नाच-गाणी आणि आनंदाच्या वातावरणात विधी पूर्ण झाले. भारतातील स्व-विवाहाची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.
लग्नाआधी मेहंदी आणि हळदी विधी पार पडला ज्यात क्षमा म्हणाली की, तिच्या शेजाऱ्यांपैकी काहींना लग्नाला आक्षेप होता आणि त्या दिवशी काही लोक अडथळा आणतील अशी भीती होती, त्यामुळे हे लग्न ठरलेल्या तारखेच्या आधी पार पाडले. “मला मंदिरात लग्न करायचे होते, पण दुर्दैवाने मला स्थळ बदलावे लागले.” लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर, क्षामाने मित्र आणि पाहुण्यांसोबत ‘लंडन ठुमुकदा’ गाण्यावर जोरदार नृत्य केले. आरशासमोर उभं राहून, क्षमाने स्वत:ला किस केलं.
हनिमूनला जाणार गोव्याला
क्षमा एका खाजगी कंपनीत काम करते. ती म्हणाली की, काही लोक हे अप्रासंगिक मानतील, परंतु तिला हे दाखवायचे होते की महिला महत्त्वाच्या आहेत. त्याचे पालक खुल्या मनाचे आहेत. त्यांनी या लग्नासाठी आशीर्वाद दिला. तर लग्नानंतर दोन आठवड्यांसाठी हनिमूनला गोव्याला जाणार आहे.